नाशिक

बसस्थानक परिसरात चोरट्यांचा डाव, दोन दुकाने फोडली

चॉकलेट, सिगारेटसह सुमारे 83 हजारांचा मुद्देमाल लंपास

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर बसस्थानक परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दुकाने फोडल्याने व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटी मोटेल्सच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली गोंदेश्वरी फुड्स अँड बेव्हरेजेस व साईछत्र पान स्टॉल ही दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली. चॉकलेट, सिगारेटसह सुमारे 83 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
सिन्नर येथील पंचवटी मोटेल्सच्या प्रवेशद्वारावर माजी नगरसेवक विजय जाधव यांचे गोंदेश्वरी फूड नावाने बेकरी व दुग्धजन्य उत्पादने विक्रीचे दुकान आहे. शेजारीच अनिल लहामगे यांचे साईछत्र पान स्टॉल आहे. रविवारी (दि.14) रात्री साडेअकराच्या सुमारास दोन्ही दुकाने नेहमीप्रमाणे बंद करण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि.15) सकाळी साडेसातच्या सुमारास गोंदेश्वरी फुड्सचे व्यवस्थापक पंकज अग्रवाल दुकान उघडण्यासाठी आले असता, शटरचे कुलूप तुटलेले व पट्टी उचकटलेली दिसली. आत पाहणी केली असता दुकानातील चॉकलेट व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. शेजारील पान स्टॉलमध्येही असाच प्रकार झाल्याचे उघड झाले.
या चोरीत गोंदेश्वरी फुड्समधून चॉकलेट व इतर वस्तूंसह सुमारे 15 हजार रुपये रोख, तर पान स्टॉलमधून विविध कंपन्यांच्या सिगारेट पाकिटांसह दोन हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. एकूण मिळून सुमारे 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात एक चोरटा दिसत आहे. त्याने तोंड झाकल्याने ओळख पटलेली नाही. नाशिकहून फॉरेन्सिक व श्वानपथकही दाखल झाले.
बसस्थानक परिसरासारख्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या चोरीमुळे व्यापार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थ व व्यापार्‍यांकडून होत आहे.

Thieves plot in bus stand area, two shops broken into
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago