घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद; दारू पिऊन का आलास, विचारल्याने राग
निफाड तालुका : प्रतिनिधी
दारू पिऊन पेट्रोलपंपावर कामावर येऊ नको, या कारणास्तव कामगाराने पेट्रोलपंप मालकावर लोखंडी रॉडने रात्रीच्या वेळी जीवघेणा हल्ला केला. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात हल्लेखोर युवकावर गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकास ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पालखेड येथील पालखेड- लोणवाडी रस्त्यालगत शरद आहेर यांच्या मालकीच्या आर.जी. आहेर पेट्रोलपंपावर अंकित रमेश घोलप काही दिवसांपासून काम करत होता. घटनेच्या दिवशी तो दारू पिऊन कामावर आला. रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास पेट्रोलपंप मालकाने, तू दारू पिऊन कामावर का आलास, असा जाब विचारला. दारू पिऊन कामावर येऊ नको, असे सांगितल्याचा राग आल्याने सदर युवकाने शरद आहेर यांना दम देत तुझा काटाच काढतो, असे बोलत शिवीगाळ केली. कार्यालयाबाहेर जात, काही वेळाने तो युवक पुन्हा कार्यालयात येत कसलाही विचार न करता, खुर्चीवर बसलेले पंपाचे मालक शरद आहेर यांच्या डोक्यात रॉडने सपासप वार करत आहेर यांना रक्तबंबाळ केले व तेथून पळ काढला. बेशुद्धावस्थेत असलेल्या शरद आहेर यांना काही नागरिकांनी तत्काळ येथील रुग्णालयात हलवले असता, परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ नाशिकला हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला अटक केली. हवालदार चंद्रकांत निकम तपास करीत आहेत.
बेरोजगार असल्याने या युवकाला पेट्रोलपंपावर वाहनांत पेट्रोल भरण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वीच ठेवले होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दोन पैसे मिळतील, त्याला दारूचे व्यसन आहे हे माहिती नसल्याने घटना घडली. माझ्यावरील जीवघेणा हल्ल्याची तीव्रता एवढी भयानक होती की, मी काहीही करू शकलो नाही. पोलिस प्रशासनाने या युवकास कठोर शासन करावे, जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत.
-शरद आहेर, आर. जी. आहेर पेट्रोलपंपाचे मालक
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…