व्यापार्याचे दीड किलो सोन्यासह आठ लाख लंपास
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड येथील डमरे कॉलनीत व्यापार्याच्या घरी धाडसी घरफोडी झाली. या घटनेत चोरट्यांनी तब्बल दीड किलोपेक्षा जास्त सोने व 8 लाखांची रोकड लंपास केली. शहरात येत्या पंधरा दिवसांत ही तिसरी मोठी चोरी झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, मनमाड येथील कॅम्प भागातील डमरे कॉलनी परिसरात दरवाजे, खिडक्या बनविणारे व्यापारी
मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. ते बाहेरगावी गेले होते. याबाबत पोलिसांना व्यापारी मुर्तुजा यांनी दिलेल्या माहितीनंतर नाशिक येथील श्वानपथकाने घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला व त्यांच्या बेडरूममधील कपाटाचे दरवाजे तोडून एक किलो 600 ग्रॅम सोने आणि आठ लाखांची रोकड लंपास केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी चोरीची घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…