नाशिक

वडगावजवळ पहाटे भीषण ट्रक अपघात

स्फोटानंतर आग, मोठी जीवितहानी टळली

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील वडगाव-कुसुंबा मार्गावरील वडगाव बसस्थानकाजवळ बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्वालाग्रही रसायनामुळे झालेल्या स्फोटानंतर दोन्ही ट्रक काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले. मात्र, पोलीस पाटील, ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक जीजे-16 एव्ही-7191 आणि एमएच-20 ईजी-4028 यांची वडगाव बसस्थानकाजवळ समोरासमोर धडक झाली. एका ट्रकमध्ये साड्यांचा माल व ज्वलनशील केमिकल होते, तर दुसर्‍या ट्रकमध्ये अ‍ॅसिड पावडरच्या गोण्या होत्या. धडकेनंतर झालेल्या स्फोटामुळे काही क्षणांतच दोन्ही ट्रकना आग लागली. आगीचे लोळ तब्बल 40 ते 50 फूट उंच उसळत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वडगावचे पोलीसपाटील खुशालचंद शिंदे यांनी तत्काळ वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 बंबांसह जवान घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
दरम्यान, एका ट्रकमधील चालक आगीत अडकून पडला होता. आग नियंत्रणात आल्यानंतर क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले. जखमी चालकास तातडीने उपचारासाठी प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच या दुर्घटनेत दादाजी वाघ (वय 52) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आगीच्या झळा जवळील दोन सलून दुकाने व एका घरापर्यंत पोहोचल्याने त्यांचेही नुकसान झाले. या घटनेमुळे सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, वडगाव परिसरातील गतिरोधकांच्या प्रश्नाकडे या अपघातानंतर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. “आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास
सुरू आहे.

Fatal truck accident near Vadgaon in the early morning

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago