पिता पुत्रावर काळाचा घाला, पुतण्या गंभीर

मनमाडला पिकअप मोटारसायकल अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू; पुतण्या गंभीर जखमी

मनमाड:   प्रतिनिधी

अंतापूर ताहाराबाद वरून देव दर्शन करून येणाऱ्या पिता पुत्रावर काळाने घाला घातला असुन यात पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पुतण्या गंभीर झाला असल्याची घटना आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास घडली मनमाड येथे घडली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पिकअप गाडीने मोटारसायकलला मागून धडक दिली यात पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्या गंभीर जखमी झाला अपघात झाल्या नंतर पिकअप गाडीने मोटारसायकल तब्बल चार ते पाच किलोमीटर पर्यंत ओढुन नेली नागरिकांनी पाठलाग करून गाडी पकडली मात्र चालक फरार झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येवला तालुक्यातील नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील किशोर ओंकार सोनवणे वय 40 ऋतिक किशोर सोनवणे वय 11 व रवींद्र बाळू सोनवणे 27 हे पल्सर मोटारसायकलवर अंतापूर ताहाराबाद येथे देव दर्शनासाठी गेलेले होते दर्शन करून परतत असतांना मनमाड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास मागून येणाऱ्या पिकअप गाडीने पल्सरला जोरदार धडक मारली धडक इतकी भयंकर होती की यात किशोर सोनवणे व त्यांचा मुलगा ऋतिक सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या रवींद्र सोनवणे हा गंभीर जखमी झाला या घटनेनंतर पिकअप गाडीने मोटारसायकल जवळपास चार किलोमीटर पर्यंत ओढत नेली मालेगाव चौफुलीवरील वाहतूक पोलिसांनी या गाडीचा पिच्छा करत गाडी पकडली मात्र चालक फरार होऊन गेला या घटनेचा मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

गोदावरीची महाआरती 200 युवा सैनिकांच्या हस्ते

नाशिक ः प्रतिनिधी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे होणार्‍या गोदावरी महाआरतीस…

5 hours ago

विभागात पॉलिटेक्निकच्या 24,680, आयटीआयच्या 15,224 जागा

नाशिक ः प्रतिनिधी इयत्ता दहावीचा राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसईचाही निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचा…

6 hours ago

पाथर्डीत अवकाळी पावसामुळे गटारी तुंबल्या

सुदाम डेमसे यांच्या मध्यस्थीने तत्काळ कार्यवाही सिडको : विशेष प्रतिनिधी प्रभाग 31 पाथर्डी परिसरात झालेल्या…

6 hours ago

पावसाळ्यापूर्वी धरणांमधील गाळ काढा

जि. प. सीईओ मित्तल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण, तलावांतून…

6 hours ago

पाइपलाइनसाठी तीनशे झाडांवर कुर्‍हाड!

वृक्षप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता नाशिक : प्रतिनिधी जुन्या जलवाहिनीची वारंवार गळती होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी…

6 hours ago

चेतनानगरमध्ये गाडीची काच फोडून मुद्देमाल लंपास

सिडको : चेतनानगरमधील बाजीराव आव्हाड चौक परिसरात पार्क केलेल्या क्रेटा गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने…

6 hours ago