महाराष्ट्र

सुट्या मसाला विक्रीवर ‘एफडीए’ची बंदी

भेसळखोरांना सात वर्षे जेल, दहा लाख दंड; आयुक्त मुंढेंचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ने मोठा निर्णय घेतला आहे. सुट्या मसाला पावडर आणि मिश्र मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आता सर्व मसाल्यांचे पॅकिंग आणि सीलिंग करूनच विक्री करावी लागणार आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही नवी नियमावली जारी केली. त्यानुसार सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. किराणा दुकानात पोत्यातून किंवा मोठ्या डब्यातून सुटी हळद, तिखट, धणेपूड विकता येणार नाही. केवळ वैध अन्न परवाना, एफएसएसएआय परवाना असलेल्यांनाच विक्री करता येईल.
मसाल्यात कृत्रिम रंगांच्या वापरासही बंदी घालण्यात आली आहे. मसाल्यांमध्ये आकर्षक दिसण्यासाठी मेटानिल यलो, रोडामाइन बी, सुदान डाईज यांसारखे औद्योगिक, कृत्रिम रंग, वीटभट्टीची भुकटी, खडू, लाकडाचा भुसामिसळण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या धोकादायक ’इथिलिन ऑक्साईड’ रसायनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, मसाले उघड्यावर वाळवण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक रस्ते, डांबरी रस्ते, गटारांजवळ, कचरा कुंडीजवळ किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. साठवणूक जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नियम मोडल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई होणार आहे. उत्पादन असुरक्षित आढळल्यास 1 ते 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. भेसळखोरांवर मोक्का सारखी कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मसाल्यांसोबत रसायने साठवता येणार नाहीत. सुटे मसाले विकल्याने भेसळीचा धोका वाढतो. नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांची अजिबात गय केली जाणार नाही, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

पॅकिंग, लेबलिंग सक्तीचे
प्रत्येक पॅकेटवर उत्पादनाचे नाव, घटक, उत्पादकाचा पत्ता, एफएसएसएआय परवाना क्रमांक, बॅच नंबर, पॅकिंग तारीख आणि बेस्ट बीफोर, एक्स्पायरी डेट स्पष्ट असणे गरजेचे. खोटे, दिशाभूल करणारे दावे करता येणार नाहीत.

कोणाला लागू होणार?
हळद, मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिंग, गरम मसाला, करी पावडर यासह सर्व मसाले. उत्पादक, घाऊक-किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स या सर्वांना हा नियम बंधनकारक असेल.

FDA bans sale of loose spices

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

6 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

6 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

6 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

7 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

7 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

7 hours ago