राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

1 नोव्हेंबरपासून ‘ट्रू-कॉलर’ची गरज संपणार

प्रत्येक फोनवर अ‍ॅपशिवाय अनोळखी कॉलरचे नाव दिसणार, सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : प्रतिनिधी
अनोळखी नंबरवरून येणार्‍या कॉलमुळे हैराण झाला आहात? आता टेन्शन संपलं. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (डीओटी) ऐतिहासिक निर्णय घेत, देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनएपी) सेवा सक्तीची केली आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2026 पासून तुमच्या मोबाइलवर अनोळखी नंबरसोबतच त्या व्यक्तीचे नावही दिसणार आहे, तेही कोणतेही अ‍ॅप डाउनलोड न करता.
डीओटीने 13 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, एअरटेल, जिओ, व्हीआय आणि बीएसएनएल या सर्व टेलिकॉम कंपन्यांना फोर-जी आणि फाइव्ह-जी नेटवर्कवर कॉलर नाव दाखविणे (सीएनएपी) डीफॉल्टने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारने सिक्युरिटी-बाय-डिझाईन चा नियम घातला आहे. म्हणजे कॉल संपताच ऑपरेटरला ते नाव त्यांच्या सिस्टममधून डिलीट करावे लागेल. ते नाव साठवून ठेवता येणार नाही.
कोणाला फायदा?
सध्या ही सेवा फक्त 4-जी आणि 5-जी वर लागू होणार आहे. 2-जी, 3-जी आणि लँडलाईनसाठी नंतर विचार केला जाईल. यामुळे स्पॅम, फसव्या कॉलवर आळा बसेल आणि ग्राहकाला कॉल घ्यायचा की नाही, हे ठरवणे सोपे होईल. ट्रू-कॉलरचे दिवस संपले का? याची चर्चा आता टेलिकॉम वर्तुळात रंगली आहे.

व्यवसायांसाठी विशेष सवलत
बिझनेस किंवा बल्क कनेक्शन असलेल्या कंपन्यांना त्यांचे ब्रँड नेम दाखवता येणार आहे. पण त्यासाठी नाव हे ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत किंवा जीएसटी पोर्टलवर नोंदवलेले असणे बंधनकारक आहे. टेलिकॉम कंपनीकडून व्हेरिफिकेशन होईल.

कसं काम करणार सीएनएपी?
नंबर सेव्ह असेल तर तुमच्या फोनबुकमध्ये सेव्ह केलेले नावच दिसेल, नेहमीप्रमाणे. नंबर अनोळखी असेल तर : कॉल करणार्‍याच्या सिम रजिस्ट्रेशनच्या वेळी टेलिकॉम कंपनीकडे नोंदवलेले नाव स्क्रीनवर दिसेल. म्हणजे आता ट्रू-कॉलरसारख्या थर्ड-पार्टी अ‍ॅपच्या डेटाबेसवर अवलंबून राहावे लागणार नाही. माहिती थेट ऑपरेटरच्या व्हेरिफाइड डेटाबेसमधून येईल. परदेशी कॉल असेल तर : स्क्रीनवर नावाऐवजी इंटरनॅशनल कॉल असे लिहिलेले दिसेल.

 

The need for ‘Truecaller’ will come to an end starting November 1st

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

7 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

7 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

7 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

7 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

7 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago