Categories: नाशिक

शीतपेय विक्रेत्यांवर एफडीएचा कारवाईचा बडगा

नाशिक :प्रतिनिधीसध्याच्या दिवसात उन्हाचा पारा हा चढत असून जवळपास ते 40 डिग्रीच्या वर असल्याने शीतपेय, फळे, आइस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट तसेच एनर्जी ड्रिंक्सची मोठयाप्रमाणात बाजारात विक्री होत असून, गुणवत्तेच्या बाबत अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.
शरदचंद्र पवार मार्केट या ठिकाणी  श्री शारदा फ्रुटस कंपनी, एपीएमसी मार्केट, पेठरोड, पंचवटी, नाशिक या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी. रासकर यांनी तपासणी करून विक्रीसाठी साठविलेल्या आंबा व आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे इथेलीन रायपनर सॅचेटस चे नमुने घेण्यात आले. त्यानंतर ओझर येथे व्ही.ए.एन.सी. एजन्सी, ओझर या ठिकाणी प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी देवरे यांनी धाड टाकून त्या ठिकाणी विक्रीसाठी साठविलेले शितपेय 1 थम्सअप, मँगो ड्रिंक्स माझा व स्टिंग एनर्जी ड्रिंकचे नमुने घेऊन स्टिंग एनर्जी ड्रिंक्सच्या 19, 200 रुपयांच्या 960 बाटल्या जप्त केल्या.
त्यानंतर व्यंकटेश डिस्ट्रीब्युटर्स, मालेगाव या ठिकाणी भेट देऊन फ्रोझन डेझटचा नमुना घेऊन विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेला आहे. दि.20 एप्रिल रोजी आकाश एजन्सी, गणेश कंपाऊंड, जऊळके या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी  योगेश देशमुख, सहायक आयुक्त विवेक पाटील यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणाहून स्टिंग कॅफिनेटड विव्हरेज, थम्सअप चार्ज कॅफिनेटड विव्हरेज व मॉनस्टर कॅफिनेटेड विव्हरेज चे नमुने घेऊन एकूण 13,200 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही धडक मोहीम संपूर्ण उन्हाळाभर सुरु राहणार आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी,  योगेश देशमुख,अमित रासकर, संदीप देवरे, वाहनचालक निवृत्ती साबळे व नमुना सहाय्यक विजय पगारे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न), . विवेक पाटील, मनिष सानप,  उदय लोहकरे व सहआयुक्त  संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

19 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

19 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

19 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago