भंडारदर्‍यात पुनवेच्या रात्री बिबट्याची डरकाळी

भंडारदर्‍यात पुनवेच्या रात्री बिबट्याची डरकाळी
राजूर, हरिश्‍चंद्रगड,भंडारदारा अभयारण्यात आढळले 1347 प्राणी पक्षी
नाशिक ः प्रतिनिधी
पारंपरिक प्राणी गणनेच्या पद्धतीबरोबर आधूूनिक पद्धतीचा अवलंब करीत राजूर, हरिश्‍चंद्रगड,भंडारदारा अभयारण्यात प्राणी,पक्षी गणना करण्यात आली. एकूण 1347 प्राणी आणि पक्षी आढळले.वनविभागातर्ङ्गे बुद्धपोर्णिमेच्या दिवशी (दि.16)प्राणी गणना करण्यात आली.प्राणी गणनेसाठी कॅमेरे आणि मचाणींचा वापर करीत पाणवठे,प्राणी येण्याच्या जागी मचाणी उभारून प्राण्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या.पोर्णिमेच्या रात्री लख्ख प्रकाशात बिबट्याची डरकाळी आणि इतर प्राण्यांचा वावर त्यांचे विविध आवाजांना मनाचा थरकाप उडविणारे दृष्य डोळ्यात साठवत वन्यजीव प्रेमी आणि वनविभागाच्या कर्मचारी अधिकार्‍यांनी अनुभवला.
बुद्ध पोर्णिमेला रात्री वन्यप्राणी गणना करण्यात येते तत्पुर्वी वनविभागातर्ङ्गे प्राणी गणनेसाठी सज्जता करण्यात आली होती.भंडारदरा विभागात एकूण 405 विविध प्राणी आणि 282 पक्ष्यांची नोंद करण्यात आली.उडदावणे,पेंडशेत,सामद्र,शिंगणवाडी,रतनवाडी,घाटघर,पांजरे याठिकाणच्या वानर,खार,ससा,रानमांजर, तरस,माकड,बिबट्या,रानडुक्कर आदी प्राणी आढळून आले. बगळा,कुंंभार कुकडा,रान कोंबडा,पान कोंबडी,होला,साळूंकी,मोर,लावरी,खंड्या आदी 282 पक्षी दिसून आले.
राजूर हरिश्‍चंद्रगड अभयारण्य येथे एकूण 340 प्राणी आणि 320 पक्षांची नोंद करण्यात आली.
कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्राणी गणना करण्यात आली.मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या,रानगाई,मुंगूस,रान डुक्कर,लांडगा आदी जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे.त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.वन्यप्राण्यांच्या संख्येत किती वाढ किंवा घट झाली याची माहिती घेण्यासाठी पोर्णिमेच्या प्रकाशात प्राण्यांच्या पायाचे ठसे,त्यांची विष्ठा या पारंपरिक पद्धती बरोबरच आधूनिक कॅमेरा ट्रॅपिंगचा वापर करून,मचाणी उभारून प्राणी निरीक्षण,गणना करण्यात येते.
भंडारदरा विभागातील वनपरिक्षेत्रात विविध प्राणी पक्षांच्या आवाज जणू काही थरकाप उडविणारा हॉरर शो पाहत आहोत अशा डरकाळ्या,चित्कार,किलबिलाट अशा अनेकविध आवाजाने पाचावर धारण प्रत्यक्षात अनुभवली.वन्यजीव प्रेमी आणि वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घेतला.
रात्रीच्या अंधारात पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवण्यात आले .
कळसूबाई अभयारण्याच्या भंडारदरा , राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट्या , तरस , मोर , माकड , वानर वन्यजीवांची हालचाल ट्रॅप कॅमेर्‍यांमध्ये दिसून आली . उडदावणे , पांजरे , कोलटेंभे , रतनवाडी आदी भागात वन्य प्राण्यांचे मचाणी वरून निरीक्षण नोंदविले गेले . 17 प्रजातींचे प्राणी 340 आणि 23 प्रकारचे 320 पक्षी असे एकूण 660 वन्यप्राणी राजूर हरिश्‍चंद्रगड येथे तर भंडारदारा अभयारण्यात 15 प्रजातीचे 405 प्राणी,16 प्रकारचे 282 पक्षी प्रगणनेत आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली .नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात दोन रानमांजर व मोरांचे दर्शन घडले . तरस आदी वन्यप्राण्यांनी दर्शन दिले .

Devyani Sonar

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

27 mins ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

44 mins ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

10 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

22 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

24 hours ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago