नाशिक : पोलीस दलाच्या वतीने गुणवत्तापूर्ण सेवा आणि कामगिरीसाठी दिले जाणारे अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव काल येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नियोजन भवन सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी शहर पोलिस विभाग, ग्रामीण पोलिस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील गौरविण्यात आलेल्या विविध पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे :
गुणवत्तापूर्ण पोलिस पदक
सहायक पोलिस उपनिरीक्षक सर्वश्री शेरखान दिलावरखान पठाण, गुलाब प्रभाकर सोनार, शेखर दशरथ फरताळे.
उत्कृष्ट सेवा पदक
पोलिस निरीक्षक युवराज दिनकर पत्की, जग्विंदरसिंग नवलसिंग राजपूत, अंकुश भालचंद्र चिंतामण, अशोक उमाजी शेरमाळे, रणजित पंडित नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत सुभाष तोडकर, पोलिस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार, पोलिस उपनिरीक्षक चेतन मार्तंड श्रीवंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलास पंढरीनाथ महाले, पोलिस हवालदार प्रशांत धोंडीराम वालझाडे, नाझीमखान फकीर मोहम्मद पठाण, सचिन अशोक काळे, अविनाश माणिक देवरे, जितेंद्र दिलीपसिंग परदेशी, घनश्याम विक्रम पाटील, मुकुंद माधवराव महाजन, किशोर संभाजी ठाकूर, मनोज पंडितराव पाटील, गिरीश सुरेश महाले, महेश वसंत साळुंके, सचिन गोपाळ जाधव, दिनेश नथू सोनवणे, विशाल दिनकर काठे, गणेश निवृत्ती फड, चंद्रकांत शिवाजी जगदाळे, संतोष विष्णुपंत उशीर, प्रशांत रामदास मरकड, योगेश विठ्ठल रेवगडे, महिला पोलिस हवालदार माधुरी रामदास मुरकुटे, पोलिस हवालदार गणेश अशोक कोंडे, विशाल भास्कर देवरे, दीपक विष्णू निकम आणि जनार्दन राघो जाधव.
याशिवाय, जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे : पोलीस निरीक्षक घनश्याम जयवंत बळप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ त्र्यंबक सानप, पोलिस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ फकिरा पगारे, प्रवीण बाळासाहेब काकड, जालिंदर उत्तम खराटे, सचिन वामन पिंगळ, सुशांत रामदास मरकड, श्रीकांत सदानंद देशमुख, आनंदा हिरामण गायकवाड, हेमंत सुरेश गिलबिले, योगेश ओमप्रकाश माळवे, मंगेश अशोक गोसावी, शरद पांडुरंग गांगुर्डे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सरस्वती निंबा पाटील, करुणा अनिल आहेर, साधना मुरलीधर खैरणार आणि पोलिस नाईक प्रदीप श्रावण बहिरम.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
पोलिस उपअधीक्षक संतोष पैलकर आणि अजित त्रिपुटे, पोलिस निरीक्षक राहुल नाईक आणि अजय सूर्यवंशी, सहायक उपनिरीक्षक अनिल भालेराव आणि राजेंद्र डांगे, हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल माळी, प्रभाकर गवळी, शरद हेंबाडे, विलास निकम, गणेश निंबाळकर, संदीप हांडगे, संदीप वणवे, प्रमोद चव्हाणके, दिनेश खैरनार, अनिल राठोड, श्रीशैल्य सवळी, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे, नितीन नेटारे आणि जितेश जाधव यांचा समावेश आहे.
अति उत्कृष्ट सेवा पदक
पोलिस निरीक्षक अंचल ईश्वर प्रसाद मुदगल, पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री सलिम फकीर माहम्मदकाजी, ज्ञानदेव बारसू राणे, शिवदास अर्जुन कुमावत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री विजय संतू लबडे, काशीनाथ रघुनाथ बागूल, शरद जनार्दन सोनवणे, सुनील भागाजी बहारवाल, नंदकुमार सूर्यभान नादुर्डीकर, पोलिस हवालदार प्रदीप चंद्रकांत म्हसदे, प्रवीण अशोक वाघमारे, अलीम फकीर मोहम्मद काजी, धनंजय कौतिक शिंदे, संतोष प्रकाश जाधव.
Felicitation of Police Officers and Personnel
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik