नाशिक

मखमलाबाद तवली डोंगरावर आज भरणर नागपंचमीची यात्रा

पंचवटी : सुनील बुनगे
मखमलाबादला शेकडो वर्षांची परंपरा असलेली व मखमलाबाद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या नवसाला पावणार्‍या नागोबा देवतेची यात्रा आज सोमवारी (दि.17) गावाजवळ तवली डोंगराच्या हिरवळीवर भरणार आहे. यात्रेनिमित्त मखमलाबाद परिसरातील नागरिकांसह पंचक्रोशीतील गावांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे.
यात्रेनिमित्त ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देवराम पवार पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिराच्या सभागृहात बैठक होऊन त्यात यात्रेचे नियोजन करण्यात आले. पूर्वी तवलीच्या टेकडीवर एक नागोबाचा चिरा होता, परंतु आज या ठिकाणी एक नागोबा नागदेवी चिर्‍याचे भव्य मंदिर थाटामाटात उभे राहिले आहे. त्याच्याच लगत मनसा माता मंदिराचीही उभारणी केली
गेली आहे.
मनसा माता देवी मंदिराच्या शेजारी नुकतेच या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे 11 हजार विविध जातींची झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे हे ठिकाण एक निसर्गरम्य झाले आहे. यात्रेच्या दिवशी लाखो रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यात्रेसाठी मखमलाबादसह पंचक्रोशीतील म्हसरूळ, आडगाव, मातोरी, मुंगसरा, दरी, गिरणारे आदी भागातील नागरिक आवर्जून हजेरी लावतात. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देवराम पवार, उपाध्यक्ष आबासाहेब मुरकुटे, संचालक भास्करराव पिंगळे, गंगाधर खोडे, सरचिटणीस मिलिंद मानकर, सदस्य मदनशेठ पिंगळे, मोतीराम पिंगळे, रमेश माळी, बाबूराव रायकर, विष्णू काकड, वास्तुविशारद पंडित काकड, हेमंत अंधृटकर, राजेश शिरसाठ आदी प्रयत्नशील आहेत. यावेळी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

The Nagpanchami fair will be held today on the Makhmalabad-Tavali hill.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago