नाशिक

आषाढी वारीत पहिल्यांदाच महिला रुग्णवाहिका चालक

सीमा शिंदे यांची प्रेरणादायी सेवा

नाशिक : दिलीपराज सोनार
परंपरा, सेवा आणि समर्पणाचा संगम मानल्या जाणार्‍या आषाढी वारीत यंदा महिलाशक्तीचा प्रेरणादायी ठसा उमटला आहे. नाशिक शासकीय रुग्णालयातील महिला रुग्णवाहिका चालक सीमा नारायण शिंदे यांनी प्रथमच वारीदरम्यान रुग्णवाहिका चालविण्याची जबाबदारी स्वीकारत नवा आदर्श निर्माण केला आहे. वारीत रुग्णवाहिकेचे सुकाणू सांभाळणार्‍या त्या पहिल्या महिला चालक ठरल्या आहेत.
मूळच्या पुणे येथील रहिवासी असलेल्या सीमा शिंदे या गेल्या अडीच वर्षांपासून नाशिक शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. सन 2024 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रियेत प्रथमच महिलांसाठी रुग्णवाहिका चालक पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यावेळी राज्यभरातून नऊ महिलांची चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये सीमा शिंदे यांचाही समावेश आहे.
लहानपणापासूनच वाहन चालविण्याची आवड असल्याने मिळालेल्या संधीचे त्यांनी सोनं केले. आवश्यक परवाने आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या त्या शासकीय रुग्णालयाच्या जननी सुरक्षा योजनेंंतर्गत गर्भवती महिलांना घरपोच रुग्णवाहिका सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कामही करत आहेत. त्यामुळे आपत्कालीन आरोग्यसेवेत त्यांचे योगदान विशेष मानले जाते.
आषाढी वारीदरम्यान भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी विविध ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. या सेवेसाठी प्रत्येक पाच दिवसांनी चालक बदलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सीमा शिंदे यांच्या जागीही महिला चालकच जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यामुळे वारीतील आरोग्यसेवेत महिलांचे योगदान अधिक ठळकपणे समोर येत
आहे.
वारीत महिला रुग्णवाहिका चालक पाहून अनेक वारकर्‍यांनी सीमा शिंदे यांच्यासोबत छायाचित्रे काढत त्यांचे कौतुक केले. या प्रतिसादामुळे आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या अशा भरती प्रक्रियेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा आणि विविध क्षेत्रांत पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महिलांना संधी दिल्यास त्या कोणतीही जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतात, याची प्रचिती सीमा शिंदे यांनी आपल्या कार्यातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे. आषाढी वारीतील त्यांची ही कामगिरी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Female ambulance driver for the first time during the Ashadhi Wari.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago