नाशिक

बडा उदासीन आखाड्यात वाद पेटला

कुंभमेळ्यावर सावट, आखाडा परिषदेचे दोन गट आमनेसामने

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
बडा उदासीन आखाड्याच्या स्वयंघोषित पंचांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा श्री महंत रघुमुनी महाराज यांनी केला आहे. 9 जुलै 2026 रोजी कांचीपुरम येथे झालेली बैठक बेकायदेशीर असून, बनावट प्रमुख महंत दुर्गादास यांनी हुकूमशाही पद्धतीने ही निवड केल्याचे रघुमुनी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आश्रमांच्या व्यवहारांवर बंदी घातल्याने निराश होऊन दुर्गादास आखाड्याची लूट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी न्यायालय आणि अखिल भारतीय आखाडा परिषद लवकरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वादाचे पडसाद अखिल भारतीय आखाडा परिषदेमध्येही उमटले असून, दोन गटांतील संघर्ष विकोपाला गेला आहे. निरंजनी आखाड्याचे श्री महंत रवींद्र पुरी आणि महानिर्वाणी आखाड्याचे श्री महंत रवींद्र पुरी यांच्यात आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. दोन्ही गट बडा उदासीन आखाडा आपल्याच सोबत असल्याचा दावा करत आहेत.
हरिद्वार येथील बैठकीत महानिर्वाणीच्या रवींद्र पुरी यांनी 13 पैकी 8 आखाडे सोबत असल्याचा दावा केला होता. त्याला प्रतिवाद म्हणून निरंजनी आखाड्याच्या गटाने त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेऊन महंत रघुमुनी यांच्यावरील आरोप न्यायालयाने फेटाळल्याचे सांगत त्यांना व्यासपीठावर स्थान दिले. यानंतर संतप्त झालेल्या दुसर्‍या गटातील श्री महंत दुर्गादास यांनी कांचीपुरम येथे पंचांची बैठक घेऊन महंत रघुमुनी यांची आखाड्यातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली.
आखाडा परिषदेतील या अंतर्गत वादामुळे आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यावर मोठे सावट निर्माण झाले आहे. हा वाद न मिटल्यास 1991 च्या कुंभमेळ्याप्रमाणे साधूंमध्ये परस्परसंघर्ष होऊन कुंभमेळा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने 35 हजार कोटी रुपये खर्चून नियोजित केलेल्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवरून या वादाची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

तथाकथित बैठकीवर सर्व मंडलातील साधूंनी बहिष्कार टाकला होता. उच्च न्यायालयाने कार्यकारिणी रद्द केली आहे. त्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. न्यायालयाच्या आदेशाचा आणि आखड्याच्या नियमांचा अवमान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
– श्री महंत रघुमुनी महाराज, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा

 

A dispute has erupted in the Bada Udasin Akhada.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago