नाशिक

ट्रकच्या धडकेत डॉक्टर महिलेचा मृत्यू

नाशिक रोड-आगर टाकळी भागात भीषण अपघात

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शहरातील खराब रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि दिवसरात्र सुरू असलेली अनियंत्रित अवजड वाहतूक यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून, त्याचा आणखी एक बळी रविवारी रात्री गेला. आगर टाकळी येथील अशोक दिवे यांच्या बंगल्यासमोर झालेल्या भीषण अपघातात नवी मुंबईतील डॉ. वंदना भास्कर निकुंभ (वय 58, रा. नेरूळ) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वंदना निकुंभ या रविवारी रात्री सुमारे दहा वाजता आपल्या भावासोबत दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी गुजरातमधील गोध्रा येथून दूध घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, डॉ. निकुंभ या रस्त्यावर
फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
या अपघातानंतर त्यांचे चुलत भाऊ दिलीप निकम तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातानंतर नाशिक रोड- आगर टाकळी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरील रस्ते अत्यंत खराब झाले असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. नाशिक रोड-आगर टाकळी परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत. शहरातील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Female doctor dies after being hit by a truck.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago