नाशिक

स्थायी समिती सदस्यासाठी फिल्डिंग

महासभेत सदस्यांची करणार नियुक्ती

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या पहिल्या विशेष महासभेत महापौर, उपमहापौर पदाची निवड केल्यानंतर आता सर्वपक्षीयांच्या नजरा स्थायी समिती सदस्यपदाच्या नियुक्तीकडे लागल्या आहेत. महापौर हिमगौरी आडके यांच्याकडून या नावाची घोषणा होणार आहे. दरम्यान, स्थायी समितीत संधी मिळावी याकरिता भाजप, शिंदेसेना, उद्धव ठाकरे सेनेतील इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. यासोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठीदेखील हालचाली सुरू आहेत. लाभाच्या पदावर वर्णी लावण्यासाठी येेत्या काही दिवसांत राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
नाशिककरांनी यंदाही भाजपला स्पष्ट बहुमत देत सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती दिल्या. महापौरपदी हिमगौरी आडके, तर युतीधर्म म्हणून शिंदेसेनेचे विलास शिंदे यांना उपमहापौर पदाची संधी दिली. महापौर, उपमहापौर या प्रमुख पदांची निवड झाल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्षपद, विषय समित्यांसह स्थायी सदस्यांच्या नियुक्त्यांकडे लक्ष लागले आहे. स्थायी समिती सभापती भाजपचा बसणार आहे; परंतु या पदावर बसण्यासाठी पक्षात राजकीय वजन वापरण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, स्थायी समिती सदस्यपदासाठी त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांकडून नावे महापौरांना दिली जाणार आहेत. नावे मिळताच महासभेत त्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट पाहण्यास मिळाला होता. मच्छिंद्र सानप यांना ऐनवेळी उपमहापौरपदावरून माघार घेण्याची वेळ आल्याने त्यांच्या समर्थकांत यावरून नाराजी आहे.

पक्षीय बलानुसार मिळणारे स्थायी सदस्य
भाजप                     –  10
शिंदेसेना                 – 03
उद्धवसेना                – 02
राष्ट्रवादी (अ.प)     – 01

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago