मनमाडला ठेकेदाराकडुन दिवसाढवळ्या वीज चोरी
करून काम सुरु…! महावितरण कारवाई करेल का..?
मनमाड: प्रतिनिधी
महावितरण म्हणजे एकदम कडक आणि वसुलीसाठी अगदी कुणाच्याही घरी जाऊन वसुली करणारी संस्था म्हणून परिचित असलेली संस्था मात्र या संस्थेच्या वतीने एकाला एक आणि दुसऱ्याला एक न्याय देतात का असा सवाल आता मनमाड शहरातील जनतेला पडलेला आहे याला कारणही तसेच आहे कुणाच्या घरचे वीजबिल थकलेले असेल तर तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात येतो मात्र लाखो रुपये खर्च करून सुरू असलेले काम मात्र ठेकेदाराकडून वीज चोरी (आकडा) टाकून करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या ठेकेदारावर कारवाई होईल का असा सवाल आता मनमाडच्या जनतेच्या वतीने विचारण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील अनेक ठिकाणी मनमाड नगर पालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लाखो रुपयांचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराकडून सर्रासपणे दिवसाढवळ्या वीज चोरी सुरू असुन या विजचोरी करणाऱ्या ठेकेदारावर महावितरण कंपनी कारवाई करेल का असा सवाल आता मनमाड शहरातील जनतेकडून विचारला जात असुन या विजचोरी संदर्भात काही स्थानिकांनी महावितरण कार्यलाय व अधिकारी यांच्याशी संपर्क साधला मात्र महावितरण तर्फे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली यामुळे महावितरण कंपनी एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम लावते का..? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे एक महिन्याच वीजबिल थकले तरी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो मग या ठेकेदाराना अभय का ..? असा सवाल आता सर्वसामान्य मनमाडकरांकडून विचारला जात आहे या विजचोरी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होईल का असा सवालही उपस्थित केला जात आहे.