नाशिक: प्रतिनिधी
ठाकरे गटाने हकालपट्टी केल्यानंतर चर्चेत आलेले माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यास प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाने उपनेते असलेल्या सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली होती. ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यादरम्यान त्यांच्या भाजपा प्रवेशाला स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता. बडगुजर यांचे सलीम कुत्त्त याच्याशी संबंध असल्याने प्रवेश देऊ नये, तसेच त्यांच्यावर इतर 17 गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या प्रवेशाला विरोध म्हणून नाशिक पश्चिम च्या आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी थेट मुंबई गाठत बावनकुळे तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नाशिक दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी मात्र पक्ष वाढवण्यासाठी कुणी जर भाजपात येत असेल तर त्यांचे स्वागत केलं जाईल, असे म्हणत बडगुजर यांच्या प्रवेशाला एकप्रकारे हिरवा कंदिलच दाखवला होता, आज मुंबईत अनेक कार्यकर्ते घेऊन गेलेल्या बडगुजर यांना प्रवेश देण्यात आल्याने स्थानिक विरोधही आता काही दिवसात मावळ्यात जमा आहे, कारण भाजपच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकारी यांना स्पष्ट सूचना देत पक्षाच्या शिस्तीला कुणीही गालबोट लावू नये असे सांगितले होते. आज मुंबईत बडगुजर यांचा प्रवेश सोहळा पार पडला तत्डपूर्वी ब डगुजर यांनी माध्यमांशी सवांद साधताना आपण भाजपला संपूर्ण महानगरात नंबर 1 चा पक्ष होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. मनसेच्या काळात महापौर पद भूषविलेलं अशोक मुर्तडक यांनीही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, याशिवाय माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह त्यांची कन्या नयना घोलप यांनी देखील प्रवेश केल्यानं शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे.
बावनकुळे आधी म्हणाले माहीत नाही नंतर मात्र हजर
सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अगोदर स्थानिक मंडळींचा विरोध, नंतर नाशिकला आलेल्या बावनकुळे यांनी दाखवलेल्या हिरव्या कंदील नंतरही स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध कायम राहिला. आज प्रवेशाचा दुपारचा मुहूर्त ठरलेला असताना दुपारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी असा काही प्रवेश सोहळा होत आहे हे आपल्याला माहीतच नसल्याचे सांगत बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत इन्कार केला होता परंतु नंतर मात्र प्रवेश सोहळ्याला ते हजर झाल्याने सकाळी त्यांनी प्रवेशाबाबत माध्यमांशी बोलताना इन्कार का केला होता, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिका निवडणुकीत ताकद दाखवू
भाजपात प्रवेश करताच बडगुजर यांनी महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद दाखवून देऊ, निवडणुकीत दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे सांगत आपण पक्ष सांगेन त्याप्रमाणे वाटचाल करू, असे सांगितले.
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…