संपादकीय

अखेर नार-पार मार्गी

अशोक थोरात

नार-पार सुमारे पन्नास वर्षांपासून चर्चेत होते व हे होणे अशक्य अशीच शक्यता असताना, महायुती सरकारने खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नार-पार मार्गी लावायचे मोठे पाऊल टाकले. स्व. डॉ. बळीराम हिरे, स्व. टी. आर. पवार, स्व. लालजी दौलत पाटील स्व. पंडित धर्मा पाटील स्व. केदा काशिराम पाटील, स्व. डॉ. दौलतराव आहेर यांच्यासारखे नार-पारसाठी प्रयत्न करणारे देवाघरी गेले. तर श्रीमती पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे, आ. राहुल आहेर, ना. दादा भुसे, मी स्वतः, प्रा. के. एन. अहिरेंची वांजूळ पाणी समितीसह अनेकांच्या समोर हा प्रश्न मार्गी लागत आहे. यात किती वर्षे जातील हे देवच जाणो.
मी शरद पवारांवर याच विषयामुळे नाराज होतो. पञकार संघाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहात शरद पवारांची भेट घेतली. मी गिरणा डावा उजवा कालवा कृती समितीचा सरचिटणीस म्हणून निवेदन व चर्चा केली. पवारसाहेबांनी हा प्रश्न लगेच मार्गी लावण्याचे आश्वासन मला दिले, पण काहीच झाले नाही व मी नाराज झालो. मध्यंतरी भाजपावाले मोदींच्या गुजरातला जाणारे पाणी वळवायची हिंमतच करणार नाहीत, अशा टीकाटिपणी अनेकांनी केल्या पण तो मुद्दाम केलेला विरोध होता हे भाजपा सरकारने कृतीतून समोर आणले आहे.
आता नाही तर काही वर्षांनी कसमादे व जळगाव जलमय होणार असून, पन्नास वर्षांपूर्वी गिरणा नदी बाराही महिने वाहत होती. आता परत ते दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. राज्यात एक दोष आहे, सार्वजनिक जनतेच्या हिताचे काम करताना श्रेय घेण्यावरून चढाओढ असते व महत्त्वाचे काम लवकर मार्गी लागत नाही. येथेसुद्धा मी केले मी केले हे दाखवण्यासाठी अनेक वर्षे वाया गेले. स्व.डॉ. बळीराम हिरे मंञी असताना ठेंगोडा सूत गिरणीवर आता नार-पार लगेच मार्गी लावतो, अशी घोषणा केली व मी पहिल्या पानावर आठ कॉलम बातमी लावली पण तसे घडले नाही. सत्तेतून बाहेर आल्यावर स्व. डॉ. हिरेंच्या सोबत पाणीप्रश्नावर काम करायची संधी मला मिळाली पण यश आले नाही. नाही नार-पार किमान मांजरपाडा वळण बंधारा तरी करा व कसमादेला दिलासा द्या यासाठी जोरात रान पेटले पण तेसुद्धा स्व. डॉ. दौलतराव आहेरांना विरोध करण्यासाठी होते व मांजरपाडा ना. छगन भुजबळांनी पळवले म्हणतात, पण ते चूक ठरते. त्यांनी कर्तृत्वाने नेले मतदारसंघासाठी.
प्रा. के. एन. अहिरेंनी विश्वासराव देवरे, निखिल पवार, शिशिर हिरे, देवा पाटील यांच्यासह मोजक्याच लोकांनी वांजूळ पाणी समितीद्वारे पाणीप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. याचसाठी तत्कालीन संरक्षण राज्यमंञी डॉ. सुभाष बाबा भामरेंनी निवडक शंभर कार्यकर्त्यांसाठी सुरगाण्याचा भाग पिंजून सर्व बघितले. किमान वीस कि.मी.पायपीट करावी लागली पण कळत नकळत श्रेय वादाने गाडी अडवली.
आता ही योजना मंजूर झाली व पहिले मोठे टेंडर निघाले म्हणजे मार्गी लागले, असे म्हणावेच लागेल. आता या योजनेसाठी सुमारे सात हजार पासष्ट कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे व आता पहिले टेंडर निघाले आहे 41 हजार 516 कोटींचे म्हणजे प्रकल्पाच्या निम्मा खर्च या कामात होणार आहे. 4116 कोटींची पहिली निविदा निघाली. त्यात पुनर्वसन जमीन अधिग्रहण अशी काही कामे होती. आता या वेळी प्रत्यक्ष धरण बांधकामे बोगदे लिफ्ट याची कामे सुरू होतील. ही योजना पूर्ण झाल्यावर गिरणा नदीत 10-76 टी.एम.सी. म्हणजेच 304-60 दशलक्ष घनमीटर पाणी शेती व पिण्यासाठी उपलब्ध होऊन गिरणा नदी बारा महिने वाहत राहील अशी अपेक्षा आहे. या योजनेमुळे साधारण 49516 हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे.
नार-पार औरंग्या व अंबिका या नद्यांचे पूरपाणी अरबी समुद्रात जाते व ते 9 धरणे बांधून साठवायचे व बोगदे लिफ्टद्वारे गिरणा नदीत सोडायचे असा अवघड प्रकल्प आहे. यामुळे तुटीच्या गिरणा खोर्‍यात सोडून तुटीचे खोरे जलमय करायचे अशी योजना आहे.
या योजनेमुळे चणकापूर पुनद गिरणा धरणावरील कालव्यांची वहनक्षमता वाढून जाईल. हा प्रकल्प शासनाने वेळेवर निधी उपलब्ध केला तरी दहा वर्षांत पूर्ण होईल. पण निधीची समस्या तयार झाली तर कदाचित अनुभवाप्रमाणे 15 /20 वर्षे निघून जातील. म्हणजे एक पिढी मागणी करून थकली व गेली दुसर्‍या पिढीला काम सुरू झाले ते दिसेल व तिसरी पिढी प्रत्यक्ष पाण्याचा लाभ घेईल, असा हा मोठा व कायापालट करून कसमादे व जळगाव सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प आहे.
या योजनेत कसमादेत 25318 हेक्टर तर जळगाव जिल्हातील 17024 हेक्टर क्षेञ सिंचनाखाली येईल. 52-52 कि.मी. पाइपाद्वारे तर 398 मीटर उंचीवर पाणी नेण्यात येईल यासाठी 31-37 कि.मी. बोगद्यातून पाणी जाईल.117060 हॉर्स पॉवर विज वापर होईल व विजेचा दरवर्षी खर्च 141-05 कोटी राहील. 3801-17 हेक्टर जमीन घ्यावी लागेल. यात वनखात्याची 939-07 हेक्टर, सरकारी जमीन 1905-24 हेक्टर तर 956-86 हेक्टर खासगी जमीन लागणार आहे. 516 कुटुंबं बाधित होतील व एकंदरीत सर्व बघता सध्या तरी काम वेगाने सुरू व्हायची अपेक्षा असली तरी भविष्यात गती मंदावली तर प्रकल्प लांबू शकतो, हाच अनुभव सर्वत्र असतो.

Finally, on the way across Nara

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago