नाशिक

प्लास्टिक, डेब्रिजप्रकरणी 41 लाखांचा दंड

शहर विद्रूप करणार्‍यांवर कारवाई, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध भागांत ड्रेबिज बांधकाम साहित्य उघड्यावर टाकणार्‍यांसह कचरा टाकून परिसर अस्वच्च्छ करणार्‍यांना महापालिकेच्या घनकचरा विभागाने दणका देत 41 लाख 28 हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. मनपाचे पथक शहराच्या गस्तीवर असून, त्यांच्याकडून शहर विद्रूपीकरणास कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मनपाचे पथक विविध ठिकाणी फिरून नियमभंग करणार्‍यांवर थेट दंडात्मक कारवाई करीत आहे. जानेवारी 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीत अस्वच्छता, प्रतिबंधित प्लास्टिक वापर आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई व्यापक केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा करून अस्वच्छता करणार्‍या 307 जणांवर कारवाई करत चार लाख 3 हजार 190 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोकळ्या भूखंडावर बांधकाम मलबा (डेब्रिज) टाकणार्‍यांवरही मनपाने कारवाई केली आहे. यात सर्व्हिस चार्जच्या माध्यमातून 50 प्रकरणांत 40 हजार 200 रुपये, तर दंडात्मक स्वरूपात 79 प्रकरणांत सहा लाख 39 हजार 700 रुपये वसूल करण्यात आले. शहरात प्रतिबंधित प्लास्टिक वापरणार्‍यांविरोधातही मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक वापराच्या 183 प्रकरणांमध्ये नऊ लाख 40 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. पालापाचोळा, प्लास्टिक, रबर व इतर कचरा जाळणार्‍या 36 जणांवर कारवाई करून 91 हजारांंचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारे, जैववैद्यकीय कचर्‍याची योग्य विल्हेवाट न लावणारे आणि इतर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आठ हजार 751 प्रकरणांत कारवाई करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणार्‍यांमध्ये घरगुती, तसेच व्यावसायिक आस्थापनांचा मोठा समावेश आहे. विलगीकरण न केलेला कचरा, तसेच ओला-सुका कचरा वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवून न दिल्याप्रकरणी चार हजार 67 प्रकरणांत कारवाई करून 14 लाख 88 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमांचा भंग केल्याप्रकरणीही मनपाने कारवाई करत तीन लाखांचा दंड ठोठावला आहे.

शहर विद्रूपीकरण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. उघड्यावर कचरा टाकणे, प्लास्टिक वापरणे आदींसह बांधकामाचा मलबा तसाच ठेवल्याप्रकरणी ही कारवाई केली जात आहे. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे.
– डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन, मनपा

Fine of ₹41 lakh imposed for plastic and debris-related violations.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago