नाशिक

गोविंदनगरमधील मनपाच्या बॉक्स क्रिकेट टर्फला आग

दोषींवर कारवाईची मागणी

सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 24 मधील गोविंदनगर येथे सुमारे 60 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या बॉक्स क्रिकेट टर्फला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
होत आहे.
गोविंदनगर येथील बांबू गार्डनलगत उभारलेला हा बॉक्स क्रिकेट टर्फ युवक व खेळाडूंमध्ये लोकप्रिय ठरत होता. मात्र, 20 जानेवारी 2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी या टर्फला आग लावली. या जाळपोळीत टर्फचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या प्रकरणी शिवसेनेचे महानगरप्रमुख व नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी सिडको विभागीय अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील सार्वजनिक व क्रीडा सुविधांचे नुकसान होणे ही गंभीर बाब असून, अशा घटनांमुळे नागरिकांच्या सोयीसुविधांवर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी क्रीडासंकुलांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेत पोलीस व महापालिका प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. मनपा निवडणुकीत हार-जीत वरून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे, तर कामटवाडे येथील एका महिलेने मुकेश शहाणे यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगून परिसरात दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला तर त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक 24 मधील बॉक्स क्रिकेट टर्फला समाजकंटकांनी लावलेली आग आणि प्रभाग क्रमांक 27 मधील पराभूत उमेदवार प्रशांत खरात यांनी काढलेल्या पायी मोर्चावरून होणारी धुसफूस, एकूणच हा सर्व प्रकार निवडणुकीतूनच होत असून, ठिकठिकाणी वादाच्या ठिणग्या पडू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निवडणुकीनंतरही राजकीय तणाव कायम?

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. निवडणुकीनंतरही काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण दिसून येत असून, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीच्या घटनांमुळे राजकीय वातावरणावर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

सिडको परिसरातील घटनांकडे लक्ष

अलीकडे सिडको परिसरात घडलेल्या काही घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोविंदनगरमधील बॉक्स क्रिकेट टर्फला आग लागण्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Fire breaks out at Municipal Corporation’s box cricket turf in Govindnagar

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago