युवकांच्या परिश्रमामुळे वाचली हजारो हेक्टर वनसंपदा
कंधाणे : वार्ताहर
बुधवारी रात्री आठच्या सुमारास कंधाणे येथील भागडा डोंगराला वरच्या टोकाला आग लागली होती. हवेत असलेल्या गारव्यामुळे ही आग पाहता पाहता वणव्याचे रूप धारण करून डोंगरावरील राखीव वनक्षेत्रातील अनेक जुन्या वृक्षांना आणि वन्यजीवांना आपल्या कवेत घेऊ लागली होती.
आगीच्या घटनेची माहिती सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी कर्मचार्यांना सूचना देत तत्काळ घटनास्थळी पाठवले. वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होताच स्थानिक युवकांनी डोंगरावर धाव घेत कर्मचारी वर्गाच्या खांद्याला खांदा लावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि दोन तासांच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग जर लवकर आटोक्यात आणली गेली नसती तर भागडा डोंगर परिसरातील हजारो हेक्टर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. बुधवारी कोणी तरी अज्ञात माथेफिरू व्यक्तीने सदरील डोंगराच्या माथ्यावर आग लावली असल्यास संशय व्यक्त केला जात आहे. रात्रीचा अंधार, आगीच्या ज्वाळा, विषारी जीवांची भीती हे सर्व असताना तरुणाईने व वनकर्मचारी वर्गाने जीवाची पर्वा न करता दोन तासांच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली. आगीच्या या घटनेची कसून चौकशी होण्याची मागणी स्थानिक वनकमिटीच्या सदस्यांनी केली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी वनपाल सुदाम पवार, वनरक्षक माणिक वाघ, वनमजूर रवी सोनवणे, वनमजूर केदा सोनवणे, शरद खैरनार यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
Fire breaks out at night on Bhagda Mountain in Kandhane
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…