नाशिक

मुसळगावला पॅकेजिंग कंपनीत आग

लाखोंचे नुकसान; जीवितहानी टळली

सिन्नर ः प्रतिनिधी
मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीमधील विनस पॅकेजिंग कंपनीतील कच्चा माल साठवणुकीच्या ठिकाणी काल (दि.2) मध्यरात्री 1.30 ते 2.00 वाजेच्या सुमारास विद्युतवाहक तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत पाच ते सात लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
कंपनीत मोठ्या प्रमाणात कोरोगेशन पेपरचा साठा असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्ररूप धारण केले. कामगार-कर्मचार्‍यांनी कंपनीतील उपलब्ध असलेल्या फायर सिस्टिमचा वापर करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
कंपनीचे डायरेक्टर अनिल आसावा यांनी तत्काळ सिन्नर नगरपालिका, माळेगाव एमआयडीसी, नाशिक महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन सव्वा ते दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीत पाच ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

fire-breaks-out-at-packaging-company-in-musalgaon

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago