लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग
श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे वाचले लाखोंचे नुकसान
लासलगाव :- समीर पठाण
लासलगाव येथील विंचूर रोड वरील चिंतन दलपत पटेल यांच्या मालकीचे पटेल सॉमिल येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती समजताच नुकताच लोकार्पण करण्यात आलेल्या श्री सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाचा अग्निशमनचा टँकर घटनास्थळी तातडीने दाखल झाला.या अग्निशामक टँकरच्या पाण्याच्या प्रेशरच्या सहाय्याने आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून या लागलेल्या आगीवर अवघ्या काही मिनिटांत नियंत्रण आणत ही आग आटोक्यात आणली.ही आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकले नाही तसेच किती नुकसान झाले याचा अद्याप आकडा हाती आलेला नाही उद्या महसूल खात्यातर्फे पचनामा झाल्यानंतर नुकसानीचा निश्चित आकडा समजून येईल. श्री सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी तत्परता दाखवून जे मदत कार्य केले याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे लासलगाव येथील नव्याने श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाचा तयार झालेला पाण्याचा अग्निशमन वाहन नसता तर निफाड चांदवड येवला पिंपळगाव बसवंत येथून अग्निशामक दलाची गाडी पोहचेपर्यंत आग आटोक्यात आली नसती व आगीने मोठे रौद्ररूप धारण केले असते
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…