नाशिक

कडधान्याने भरलेल्या धावत्या ट्रकला आग

ओझर : वार्ताहर
मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील एचएएल उड्डाणपुलाजवळ (ओझर) कडधान्याने भरलेल्या धावत्या ट्रकला आग लागली. या घटनेत ट्रकचे केबिन व मागील टायर जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
समजलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास कडधान्याने भरलेला ट्रक (एमएच 18 बीझेड 6493) मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात असताना ट्रकच्या मागील टायरमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालक मोहम्मद अश्रफ अन्सारी (रा. धुळे) याच्या लक्षात आल्यानंतर प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला. मात्र, काही क्षणातच ट्रकने पेट घेतला. आगीत ट्रकचे इंजिन केबिन व टायर जळाले. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव महामार्ग पोलीस केंद्र व ओझर पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माळोदे यांच्यासह अंमलदार सानप, काकवीपुरे व टोंगारे यांनी परिस्थितीचा ताबा घेत महामार्गावरील वाहतूक तत्काळ सर्व्हिस रोडने वळवली.
दरम्यान, एचएएल व ओझर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे बंब तेथे दाखल झाले. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. ट्रक रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे काही वेळेनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

Fire breaks out in a moving truck loaded with pulses

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात लग्नमंडपात राडा

नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न येवला : प्रतिनिधी प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला.…

46 minutes ago

आरोग्य ते शेतीपर्यंतच्या कामगिरीचे मोदींकडून कौतुक

मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…

49 minutes ago

अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

59 minutes ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…

1 hour ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्‍या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…

1 hour ago

गोदाकाठी सामूहिक शंखनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…

1 hour ago