नाशिक

प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात लग्नमंडपात राडा

नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न

येवला : प्रतिनिधी
प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला. मुलीकडच्या मंडळींनी नवरदेवासह त्याच्या काही नातेवाइकांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
येवला शहरातील ऋषभ दीपक भगुंडे या तरुणाने निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील तरुणीशी सप्टेंबर महिन्यात पळून जाऊन कोर्ट मॅरेज (प्रेमविवाह) केले होते. या प्रेमविवाहाचा राग मुलीच्या नातेवाइकांच्या मनात होता. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2026 रोजी येवल्यातील एका लॉन्सवर या जोडप्याचा पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नविधी सुरू असतानाच मुलीच्या बाजूचे नातेवाईक अचानक मंडपात आले आणि त्यांनी नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयित हल्लेखोरांनी लग्न मंडपातच नवरदेव, त्याची आई आणि इतर नातेवाईकांच्या अंगावर डिझेल (ज्वलन्शील पदार्थ) ओतून त्यांना जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही बाजूचे 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाला आहे. येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे
पोलिसांनी मुलगी आणि मुला कडील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे लग्न मंडपात लहान मुले, महिला आणि उपस्थितांवर पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाने हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप मुलाकडील व्यक्तींनी केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, येवला शहर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Uproar at a wedding venue in Yeola, fueled by anger over a love marriage

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सप्तशृंगगडावर छबीना उत्सव साजरा

कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्‍याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…

4 minutes ago

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…

11 minutes ago

इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे 15 लाखांची आर्थिक फसवणूक

50 लाखांच्या परताव्याचे दिले होते आमिष सिडको : प्रतिनिधी इन्स्टाग्रामवरील रील्सद्वारे कंपनीची माहिती देत 15…

21 minutes ago

नाशिकमध्ये बेकायदा बाइक टॅक्सींचा सुळसुळाट

अ‍ॅग्रिगेटर धोरणाची मंजुरी नसल्याचा परिवहन विभागाचा दावा पंचवटी : प्रतिनिधी नाशिक शहरात रॅपिडो, ओला आणि…

27 minutes ago

पवननगर पोलीस चौकी ओसाड

सिडको : प्रतिनिधी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथील पोलीस चौकी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून…

37 minutes ago

आरोग्य ते शेतीपर्यंतच्या कामगिरीचे मोदींकडून कौतुक

मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…

2 hours ago