राजरत्ननगरला संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
सिडको : प्रतिनिधी
घरातील सदस्य कामावर, तर मुले शाळेत गेलेली असताना वीजमीटरच्या मुख्य वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने राजरत्ननगर येथील शिव चौकातील एका घराला आग लागली. बुधवारी (ता. 14) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. उत्तमनगर परिसरातील राजरत्ननगर गार्डनजवळ हे घर आहे. वीजमीटरच्या मुख्य वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर घरातील वायरिंगने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमध्ये दूरचित्रवाणी संच, पंखे तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घरातील साहित्य जळून नुकसान झाले. आगीच्या धुरामुळे घरातील भिंतीही काळवंडल्या.
या घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे वायरमन आणि नगरसेविका योगिता हिरे यांच्यासह त्यांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. वीजपुरवठा खंडित करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. घरातील गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढण्यात आल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. आगीमुळे घरातून धुराचे मोठे लोट बाहेर पडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेमुळे परिसरातील घरांच्या मुख्य वीजजोडण्या आणि अंतर्गत वायरिंगच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्युत केबल आणि वायरिंगची नियमित तपासणी करून संभाव्य धोके दूर करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Fire in the house wiring
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…