पाच ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली

नाशिक : प्रतिनिधी
पाच ग्रामसेवकांवर विभागीय चौकशीनंतर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली. मालेगाव तालुक्यातील सवंदगावचे ग्रामसेवक कैलास चिंतामण निकम यांनी कत्तलखान्यास परवानगी देऊ नका, असे ग्रामसभेने सांगूनही परवानगी दिली. उसवाड (ता. चांदवड) येथील राजेंद्र भावराव निकम यांनी दप्तर दिरंगाई केल्याने त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत. अजंदे (ता. मालेगाव)चे संजय यशवंत शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दप्तर न ठेवणे, कार्यभार हस्तांतरण न करणे या दोषारोपावरून एक वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. मासुरली (ता. इगतपुरी)चे ग्रामसेवक अरुण शिवाजीराव गोंधळे हे नेहमी अनधिकृत गैरहजर राहत असल्याने त्यांची एक वार्षिक वेतनवाढ बंद केली आहे. अजबराव रुस्तमराव निकम, पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) यांच्यावर दप्तर अद्ययावत न ठेवणे या दोषारोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *