सिडको : प्रतिनिधी
बनावट लग्न लावून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बळवंत साहेबराव पाटील (वय 42, रा. वायपूर, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 पासून ते आजपर्यंत क्रांतीनगर झोपडपट्टी, उंटवाडी तसेच नाशिक परिसरात आरोपींनी संगनमत करून बनावट विवाह लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रोख स्वरूपात 5 लाख रुपये तसेच फोन पेद्वारे 28 हजार रुपये, असा एकूण 5 लाख 28 हजार रुपयांचा मोबदला घेत फसवणूक केली. या प्रकरणी गीता नरेश कोसारे, संगीता भिवाजी मोरे, जयश्री शिरीष मोहिते, पुष्पा राकेश रामटेके, जयश्री संजय शिंगाडे, प्राची सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, सोनाली अशोक वाकडे व खंडू सोनवणे यांच्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलिस करीत आहेत.
Five lakhs cheated with the lure of fake marriage
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…