लखनऊच्या निवृत्त शिक्षिकेचे 30 हजार लंपास
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या खांद्यावर अटकवलेल्या पर्समधून 30 हजार रोकड भुरट्या चोराने लंपास केली आहे. याबाबत गोमतीनगर, लखनऊ, उत्तर प्रदेश येथील निवृत्त शिक्षिका सुषमा घनश्याम सिंग (वय 61) यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार 29 मार्चला सुषमा सिंग आणि त्यांची मुलगी निमिषा सिंग त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीसाठी आल्या होत्या. सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मायलेकी रांगेत उभ्या राहिल्या. दुपारी एकच्या सुमारास त्यांनी गर्भगृहाच्या समोर येत पिंडीचे दर्शन घेतले. दर्शन घेत असताना त्यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावर अटकवलेली राखाडी रंगाची पर्स होती. त्यामध्ये एकूण रोख रु. 30,000 रु. व कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड ठेवलेले होते. दर्शन झाल्यानंतर दोघी जणी मंदिराच्या बाहेर आल्या त्यावेळी त्यांचे लक्ष गेले तर पर्सची चेन खुली दिसली म्हणून त्यांनी पर्समध्ये ठेवलेले पैसे व कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड आहे का? ते बघितले असता सदर पर्समध्ये पैसे व डेबिट कार्ड मिळून आले नाही. त्यांनी मंदिराच्या बाहेर आजूबाजूला पैसे व डेबिट कार्ड पडले असावे, या शंकेने सापडवण्याचा प्रयत्न केला, मात्र डेबिट कार्ड व पैसे मिळून आले नाही. पैसे व कार्ड चोरीला गेले असल्याचे लक्षात आले. पर्समध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा, 200 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 30 नोटा व 50 रुपयांच्या 60 नोटा असे एकूण 30 हजार रुपये रोकड आणि एक कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड चोरीला गेले आहे.
Devotees in Trimbakeshwar are unsafe due to thieves
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…