स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अन्य दोघे फरार
मालेगाव : प्रतिनिधी
बकरी ईदच्या दृष्टीने गोवंश जनावरांची चोरी करणार्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या गुन्ह्यात मालेगाव, धुळे येथील पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. अन्य दोघे फरार झाले.
मालेगाव तालुक्यात गोवंश जनावरे चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. शेतकर्यांनी मंत्री दादा भुसे यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली होती. मंत्री भुसे यांनी दखल घेत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांना टोळीला पकडण्याची सूचना केली होती.
या गुन्ह्यात मालेगावसह धुळे येथील सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हेशाखा व अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा व मालेगाव पथकाने मालेगाव व धुळे शहरातील शाकीर शाह इब्राहिम शाह फकीर (वय 35, रा. भोईवाडा, जि. धुळे), रहेमान शाह, हारुन शाह (38, रा. मालदे शिवार, मालेगाव), मोहम्मद शाह हुसैन शाह, हारून शाह (30, रा. वडजाई रोड, धुळे), संतोष किरणसिंग परदेशी (20, रा. वडजाई रोड, धुळे), बशीर शेख अजगर ऊर्फ फहिम हांड्या (23, रा. पवारवाडी, मालेगाव) यांना ताब्यात घेतले. यातील संशयित शेख सुलतान अब्दुल रज्जाक (रा. म्हाळदे शिवार, पवारवाडी) व रहेमान अस्लम कुरेशी (रा. भिक्कू चौक, मालेगाव) फरार आहेत. संशयितांनी गोवंश जनावरे चोरीची कबुली दिली.
संशयितांकडून चारचाकी वाहन (एमएच 02-डीएस 7609) वडनेर खाकुर्डी पोलिसांनी जप्त केले. संशयितांक़डून 25 हजार रुपये हस्तगत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर, पोलिस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, हवालदार गिरीश निकुंभ, शरद मोगल, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार
ताब्यात घेतलेले संशयित शाकीर शाह धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, तो सराईत गुन्हेगार आहे. तो मालेगाव येथील शेख सुलतान अब्दुल रज्जाक व रहेमान अस्लम कुरेशी यांच्यासोबत चोरी करण्यासाठी लागणारे गोवंश जनावरे बांधलेल्या ठिकाणांची रेकी करायचा. यासाठी इर्टिगा कारचा वापर तो करत होता. बंद गोठ्यातून कटरने जाळी तोडून व मोकळ्या ठिकाणी बांधलेली जनावरे सोडून कत्तलीसाठी चोरी करत असल्याचे उघडकीस आले आहे.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…