नाशिक

गोवंश चोरणार्‍या पाच संशयितांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अन्य दोघे फरार

मालेगाव : प्रतिनिधी
बकरी ईदच्या दृष्टीने गोवंश जनावरांची चोरी करणार्‍या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या गुन्ह्यात मालेगाव, धुळे येथील पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. अन्य दोघे फरार झाले.
मालेगाव तालुक्यात गोवंश जनावरे चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. शेतकर्‍यांनी मंत्री दादा भुसे यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली होती. मंत्री भुसे यांनी दखल घेत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांना टोळीला पकडण्याची सूचना केली होती.
या गुन्ह्यात मालेगावसह धुळे येथील सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हेशाखा व अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा व मालेगाव पथकाने मालेगाव व धुळे शहरातील शाकीर शाह इब्राहिम शाह फकीर (वय 35, रा. भोईवाडा, जि. धुळे), रहेमान शाह, हारुन शाह (38, रा. मालदे शिवार, मालेगाव), मोहम्मद शाह हुसैन शाह, हारून शाह (30, रा. वडजाई रोड, धुळे), संतोष किरणसिंग परदेशी (20, रा. वडजाई रोड, धुळे), बशीर शेख अजगर ऊर्फ फहिम हांड्या (23, रा. पवारवाडी, मालेगाव) यांना ताब्यात घेतले. यातील संशयित शेख सुलतान अब्दुल रज्जाक (रा. म्हाळदे शिवार, पवारवाडी) व रहेमान अस्लम कुरेशी (रा. भिक्कू चौक, मालेगाव) फरार आहेत. संशयितांनी गोवंश जनावरे चोरीची कबुली दिली.
संशयितांकडून चारचाकी वाहन (एमएच 02-डीएस 7609) वडनेर खाकुर्डी पोलिसांनी जप्त केले. संशयितांक़डून 25 हजार रुपये हस्तगत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर, पोलिस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, हवालदार गिरीश निकुंभ, शरद मोगल, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार

ताब्यात घेतलेले संशयित शाकीर शाह धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, तो सराईत गुन्हेगार आहे. तो मालेगाव येथील शेख सुलतान अब्दुल रज्जाक व रहेमान अस्लम कुरेशी यांच्यासोबत चोरी करण्यासाठी लागणारे गोवंश जनावरे बांधलेल्या ठिकाणांची रेकी करायचा. यासाठी इर्टिगा कारचा वापर तो करत होता. बंद गोठ्यातून कटरने जाळी तोडून व मोकळ्या ठिकाणी बांधलेली जनावरे सोडून कत्तलीसाठी चोरी करत असल्याचे उघडकीस आले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

12 seconds ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

5 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

9 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

12 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

19 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

33 minutes ago