सावानाच्या वस्तुसंग्रहालयास पाच हजार नागरिकांची भेट

 

नाशिक : प्रतिनिधी  सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयाला गेल्या चार दिवसांत पाच हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली . वस्तुसंग्रहालयाचा हा अनमोल खजिना बघून अक्षरशः चकित झाले . हे वस्तुसंग्रहालय कायमस्वरूपी खुले करावे , अशी मागणी होत असल्याने त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन वस्तुसंग्रहालय सचिव प्रेरणा बेळे यांनी दिले .  , या विभागात असलेले जुने ऐतिहासिक शस्त्रगार , काचचित्रे , गंजिफा , धातूच्या मूर्ती , नाणी , चित्रे , अनोखा ठेवा आपणास येथे बघावयास मिळतो . शिल्पकला , चित्रकला तसेच प्राचीन तत्कालीन इतिहासाचे नमुने बघून अनेकांचे डोळे विस्फारले गेले . नाशकात प्राचीन वस्तूंचे इतके ज्ञानभांडार असेल याची आम्हाला कल्पनाच नव्हती . मात्र , प्रेरणा बेळे यांच्या  पुढाकारामुळे आम्हाला त्याचे दर्शन घडले . त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार थोडे आहे , अशा बोलक्या प्रतिक्रियाही बरेच काही सांगून जाते . ।  दरम्यान , शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलावून हे वस्तुसंग्रहालय त्यांना दाखविण्याचा तसेच पर्यटकांसाठी ते खुले करण्याचा आपला मानस असून , कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल , असेही प्रेरणा बेळे यांनी पुढे नमूद केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *