नाशिक : प्रतिनिधी सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयाला गेल्या चार दिवसांत पाच हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली . वस्तुसंग्रहालयाचा हा अनमोल खजिना बघून अक्षरशः चकित झाले . हे वस्तुसंग्रहालय कायमस्वरूपी खुले करावे , अशी मागणी होत असल्याने त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन वस्तुसंग्रहालय सचिव प्रेरणा बेळे यांनी दिले . , या विभागात असलेले जुने ऐतिहासिक शस्त्रगार , काचचित्रे , गंजिफा , धातूच्या मूर्ती , नाणी , चित्रे , अनोखा ठेवा आपणास येथे बघावयास मिळतो . शिल्पकला , चित्रकला तसेच प्राचीन तत्कालीन इतिहासाचे नमुने बघून अनेकांचे डोळे विस्फारले गेले . नाशकात प्राचीन वस्तूंचे इतके ज्ञानभांडार असेल याची आम्हाला कल्पनाच नव्हती . मात्र , प्रेरणा बेळे यांच्या पुढाकारामुळे आम्हाला त्याचे दर्शन घडले . त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार थोडे आहे , अशा बोलक्या प्रतिक्रियाही बरेच काही सांगून जाते . । दरम्यान , शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलावून हे वस्तुसंग्रहालय त्यांना दाखविण्याचा तसेच पर्यटकांसाठी ते खुले करण्याचा आपला मानस असून , कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल , असेही प्रेरणा बेळे यांनी पुढे नमूद केले .
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…