ऐतिहासिक क्षणाला मोदींची उपस्थिती
अयोध्या :
उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी नवीन इतिहास लिहिला जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा विजय ध्वज फडकवण्यासाठी एक भव्य समारंभ आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणार आहेत.
ध्वजात सूर्याचे प्रतीक असेल, जे भगवान रामाच्या सूर्यवंशी वंशाचे आणि दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे. पॅराशूट उत्पादनात विशेषज्ज्ञ असलेल्या अहमदाबाद येथील एका कंपनीने हा ध्वज डिझाइन केला आहे. 11 फूट रुंद आणि 22 फूट लांब असा या ध्वजाचा आकार आहे. हा ध्वज तीन थरांचा असून, तो रेशमी सिल्कचा आहे आणि त्याचा रंग पितांबरी आहे. हा रंग सूर्योदयापूर्वी क्षितिजावर दिसणार्या लालसर रंगासारखा आहे. सूर्य, पाऊस आणि जोरदार वारा सहन करण्यासाठी हा विशेष पॅराशूट कापड आणि रेशमी धाग्यांपासून बनवला आहे. या ध्वजावर हाताने नक्षीकाम करून भगवान रामाचे राजचिन्ह असलेले कोविदार वृक्ष, सूर्यदेवाचे प्रतीक आणि त्या सूर्याच्या मध्यभागी ओंकार हे चिन्ह बनवण्यात आले आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी एकूण सहा कारागिरांनी मेहनत घेतली आहे. हा समारंभ सुमारे चार तास चालेल.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…