महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या भरतपूरमध्ये फ्लेमिंगोंचे आगमन

नांदूरमध्यमेश्वरमध्ये परतीच्या प्रवासात मुक्काम, पक्षीनिरीक्षणाची संधी

निफाड : आनंदा जाधव
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात मंगळवारी (दि. 27) सकाळी भटकंंती करणारे गाइड व कर्मचारी यांना 100 ते 150 च्या समूहाने दाखल झालेल्या फ्लेमिंगोंचे दर्शन झाले. लवकर आलेल्या मॉन्सूनबरोबरच फ्लेमिंगो पक्ष्यांचेदेखील रुबाबदार आगमनामुळे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात विहंगम दृश्य पाहावयास मिळत आहे. साहजिकच हिवाळ्यानंतरदेखील पर्यटकांना आता थोडे दिवस पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटता येणार आहे.
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात मध्यंतरी वन विभागाने पाणवेली निर्मूलनाचे काम केल्यामुळे अभयारण्यातील अधिवास मोकळा श्वास घेत आहे. फ्लेमिंगोला उपयुक्त शेवाळ खाद्य उपलब्ध झाल्याने परतीच्या प्रवासातदेखील फ्लेमिंगोंचा थवा अभयारण्यात मुक्काम ठोकून आहे. हा थवा अभयारण्यातील स्टोर्क जेट्टी परिसरात तळ ठोकून आहे. वातावरणातील बदलामुळे पक्षी स्थलातरानंतर काळ व वेळ यात मोठा बदल होतो. कदाचित फ्लेमिंगोंच्या बाबतीतही असेच काहीसे झाले असेल.
फ्लेमिंगो हे परतीच्या प्रवासात दरवर्षी नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात येतात. परंतु ते जूनमध्ये. यावर्षी त्यांच्या परतीच्या प्रवासात हे पक्षी जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे रामसर दर्जाचे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात टायफा व पाणेली निर्मूलनाबरोबरच पक्षी आधिवास संवर्धनाची व संरक्षणाच्या झालेल्या कामाची ही पावती समजण्यास हरकत नाही. त्यासाठी वनरक्षक संदीप काळे यांनी पक्षी अभयारण्यात पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले. पक्षिमित्र अमोल दराडे, रोशन पोटे, पंकज चव्हाण, प्रमोद दराडे, विकास गारे, प्रवीण मोगल यांनीदेखील पर्यटकांंना चांगली सेवा दिली जात असल्याने पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढताना दिसत आहे, असे सांगितले.

दरवर्षी मुंबईच्या ऐरोली, शिवडी, ठाण्याची खाडी या परिसरात लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात. तसेच जायकवाडी धरण परिसरातदेखील येतात. साधारणतः एप्रिल, मेपर्यंत हे पक्षी मुक्काम करतात. त्यानंतर परतीच्या प्रवासात ते इकडे येतात. मागील वर्षीदेखील आपल्याकडे चार ते पाच दिवस या पक्ष्यांचा मुक्काम होता. यावर्षीही मंगळवारपासून शंभर ते दीडशेच्या संख्येने फ्लेमिंगो दिसून येत आहेत. सध्या या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे.
– गंगाधर आघाव, पक्षिमित्र, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago