नाशिक

कापसाची किमान किंमत 7,710 रुपये तर सोयाबीनची 5328 रुपये निश्चित करण्यात आली

विविध प्रकारच्या शेतमालाला आधारभूत किंमत मिळणार

नवी दिल्ली : खरिपाची तयारी सुरू असताना शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने धान, कापूस, सोयाबीन आणि तूर यांसह 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 28 मे) हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, धानाचा नवीन किमान आधारभूत किमतीचा दर 2,369 रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो मागील किमान आधारभूत किमतीपेक्षा 69 रुपये जास्त आहे. कापसाची नवीन किमान आधारभूत किंमत 7,710 रुपये तर सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 5328 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याच्या दुसर्‍या प्रकाराचा नवीन एमएसपी 8,110 रुपये करण्यात आला आहे, जो पूर्वीपेक्षा 589 रुपये जास्त आहे. तांदूळ, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि बार्ली, चणा, तूर, उडीद, मूग आणि मसूर यांसह तेलबिया रेपसीड-मोहरी,शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई, काजू या शेतमालाला एमएसपी मिळते. कापूस, ऊस, कोपरा, कच्चा ताग या रब्बी पिकांचा यामध्ये समावेश आहे. खरीप पिकांमध्ये भात (तांदूळ), मका, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग, ऊस, सोयाबीन, उडीद, तुरी, हरभरा, ताग, अंबाडी, कापूस इत्यादी खरीप पिकांची पेरणी जून-जुलैमध्ये केली जाते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यांची कापणी केली जाते. केंद्र सरकारने 2025-26 साठी किसान क्रेडिट कार्ड व्याज अनुदान योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढील आर्थिक वर्ष 2025-26 साठी व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) सुरू ठेवण्यास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. ही योजना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी ) द्वारे शेतकर्‍यांना कमी व्याजदराने कर्ज देण्यासाठी आहे.

शेतकर्‍यांच्या शेतमाल खरेदीची हमी

किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांसाठी मिळणारा हमीभाव.

जरी त्या पिकाचे भाव बाजारात कमी असले तरी. यामागील तर्क असा आहे की,

बाजारात पिकांच्या किमतीतील चढउताराचा शेतकर्‍यांवर परिणाम होऊ नये.

त्यांना किमान किंमत मिळत राहिली पाहिजे. सरकार प्रत्येक पीक हंगामापूर्वी

सीएसीपी म्हणजेच कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशीनुसार एमएसपी

निश्चित करते. जर एखाद्या पिकाचे भरघोस उत्पादन होत असेल आणि बाजारात

त्याचे भाव कमी असतील, तर त्यांच्यासाठी एमएसपी निश्चित हमी किंमत म्हणून काम करते.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago