नाशिक

मुख्यमंत्र्यांना कचरा गोळा करण्याची सवय

 

 

खा. संजय राउतांची घणाघाती टीका

 

 

नाशिक : प्रतिनिधी

भाजपाला छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल कधीच प्रेम नव्हते. जेव्हा छत्रपतींचा अपमान झाला त्यावेळी यांची वाचा गेलेली असते. तसेच शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, कचऱया समोर मुख्यमंत्री भाषण करतात. ठाकरे गटातून शिंदे गटात जाणारे चोर, लफंगे आणि कचरा असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राउत यांनी शिंदे गटावर केली.

शुक्रवारी खा. राउत नाशकात दाखल झाले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून आउटगोइंग वाढून शिंदे गटात इनकमींग सुरु झाल्याने या पार्श्वभूमिवर खा. राउत नाशिक दौर्‍यावर आल्याने यास महत्व प्राप्त झाले आहे. विशेषत: खा. राउत शुक्रवारी नाशिक दौर्‍यावर येण्याआधीच सकाळी तब्बल पन्नासहून अधिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी मुंबइत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश झाला. हे प्रवेश शिंदे गटाचे सचिव व ठाकरे गटात असताना राउतांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाउसाहेब चौधरी व माजी विरोधी पक्षनेते यांनी घडवून आणल्याचे बोलले जात आहे. नाशकात येताच खा. राउत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, समृद्धीच्या टक्केवारीतुन पक्ष बनत नाही, पक्ष हा रक्त घामातुन बनत असल्याची जळ्जळीत टीका यावेळी त्यांनी केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाच लाख कोटींची गुणतवणुक महाराष्ट्रातुन नेता आणि आमच बिर्‍हाड जर्मणीला गुणतवणुक आणण्यासाठी जात असल्याची टीकाही राउतांनी यावेळी केली.

नारायण राणेंना उत्तर दिल्या पासुन त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृत्ती साठी चांगल असल्याचा टोला त्यांनी राणे यांना लगावला. त्यांनी माझ्यांशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझ नाव संजय राऊत आहे , राणे तुम्ही गुंड,तर मी महागुंड , कुठे येवु, मी कुणालाही घाबरणार नाही, कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही. नाशिक शहरामधुन शिंदे गटात गेलेल्या मध्ये एखाद दुसर नाव परिचयाच असेल मात्र इतर कोण आहेत. हे आम्हाला माहिती नाही.

 

 

 

खा. राउत पदाधिकार्‍यांशी साधणार संवाद

 

नाशिक शहराचा आजवर असलेला ठाकरे गटाचा अभेद गडाला मागील महिन्यापासून सुरुंग लागला आहे. एकएक करुन माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षाला सोडचिट्ठी देत शिंदे गटात जाणे पसंत करत आहे. पक्षाची आणखी पडझड होउ नये याकरिता खा. संजय राउत यांनी पुन्हा नाशिकला येत पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे. यासह पदाधिकार्‍यांचा मेळावाही ते घेणार आहे.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago