नाशिक

ओझर पाठोपाठ शिर्डीतूनही हैदराबाद विमानसेवेचा विस्तार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या ओझर विमानतळावरून हैदराबादसाठी सुरू असलेल्या विमानसेवेसाठी 78 ऐवजी 180 आसनी विमान उपलब्ध करून देण्यात आलेले असतानाच आता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनही इंडिगो कंपनीने हैदराबादसाठी चार नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. त्यामुळे व्यवसाय, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनासाठी हैदराबादला जाणार्‍या नाशिककरांना प्रवासाच्या वेळा निवडण्याची अधिक संधी मिळणार आहे. या नवीन उड्डाणांमुळे शिर्डी विमानतळावरील दैनंदिन उड्डाणांची संख्या आठवरून बारावर पोहोचली आहे.
नाशिकपासून रस्तेमार्गाने सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्डी विमानतळाचा उपयोग नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी करतात. ओझरहून उपलब्ध असलेली विमानसेवा प्रवाशांच्या वेळेशी जुळत नसल्यास शिर्डीचा पर्याय विचारात घेता येणार आहे.
विशेषतः सकाळी हैदराबादला जाण्याचे नियोजन असलेल्या प्रवाशांसाठी शिर्डीहून सकाळी 8.30 वाजताचे उड्डाण उपयुक्त ठरू शकते. हैदराबाद हे देशातील माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, संशोधन आणि उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. नाशिकमधील औद्योगिक क्षेत्राचाही हैदराबादशी व्यावसायिक संपर्क आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना या विमानसेवेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
हैदराबाद विमानतळावरून देशातील अन्य प्रमुख शहरांसाठी उपलब्ध असलेल्या विमानसेवांमुळे पुढील प्रवासाचे पर्यायही खुले होतात. नवीन वेळापत्रकानुसार हैदराबादहून सकाळी 8.10 आणि दुपारी 4 वाजता विमाने शिर्डीत दाखल होतील. शिर्डीहून सकाळी 8.30 आणि दुपारी 4.20 वाजता विमाने हैदराबादकडे रवाना होतील. हैदराबाद आणि परिसरातून मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असल्याने या विमानसेवेचा धार्मिक पर्यटनालाही फायदा होणार आहे. त्याचबरोबर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रवाशांसाठीही हवाई संपर्काचे पर्याय वाढणार आहेत.

ओझरहून आता 180 आसनी विमान
नाशिकच्या ओझर विमानतळावरून हैदराबादसाठी सुरू असलेल्या इंडिगोच्या थेट विमानसेवेची प्रवासी क्षमता वाढविण्यात आली आहे. 25 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या हिवाळी वेळापत्रकात या मार्गावरील 78 आसनी विमानाच्या जागी 180 आसनी विमान उपलब्ध करण्यात आले आहे. ओझरहून दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या चार शहरांसाठी दैनंदिन विमानसेवा उपलब्ध आहे. नवीन वेळापत्रक 27 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहे.

Following Ozar, Hyderabad flight service expanded to include Shirdi as well

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शहरात धर्मध्वजारोहणाची तयारी पूर्ण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणार्‍या…

12 minutes ago

कर थकबाकीचा डोंगर हजार कोटींच्या पार

1,245 कोटींपैकी अवघी 191 कोटींची वसुली पाच महिन्यांत वसुलीचे आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील घरपट्टी…

20 minutes ago

सुरळीत वाहतुकीसाठी समांतर मार्ग महत्त्वाचा

उपमुख्यमंत्री शिंदे : गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन नाशिक : प्रतिनिधीं नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती…

31 minutes ago

वाढता वाढता वाढे डेंग्यू रुग्णांची संख्या

तीन आठवड्यांत संख्या 109 वर नाशिक : प्रतिनिधी शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असून, ऑक्टोंबरच्या तीन…

37 minutes ago

बलेनो कारमधून आले अन् शेळ्या-मेंढ्या घेऊन पसार झाले

शहा येथे मध्यरात्री चोरी; 73 हजारांचा मुद्देमाल लंपास सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा येथे मध्यरात्री…

1 hour ago

नाशिक-पुणे महामार्गावर सात पिकअप वाहनांतून 16 बैलांची दाटीवाटीने वाहतूक

प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा सिडको : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर परिसरात…

1 hour ago