नाशिक

कर थकबाकीचा डोंगर हजार कोटींच्या पार

1,245 कोटींपैकी अवघी 191 कोटींची वसुली पाच महिन्यांत वसुलीचे आव्हान

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर तब्बल एक हजार 54 कोटींवर गेला आहे. विशेष म्हणजे, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी येत्या पाच महिन्यांत सदर रक्कम वसुलीचे आव्हान करसंकलन विभागासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, हजार कोटींपैकी शास्तीची जुनी थकबाकीची रक्कम 776 कोटींच्या घरात गेली आहे. पाणीपट्टीचीदेखील थकबाकी 228 कोटींवर पोहोचली आहे. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणासाठी (एसआयआर) कर विभागातील मनुष्यळ वळविल्याने कर वसुलीत अडथळे आले. त्यामुळे थकबाकीची रक्कम हजार कोटींच्या वर गेल्याचे बोलले जाते.
शहरात सहा लाख 42 हजार 389 घरपट्टीधारक आहेत; परंतु यंदा करवसुली कासवगतीने होत असल्याने थकबाकीचा डोंगर हजार कोटींच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे, यंदा अभय योजनेची अंमलबजावणी न केल्याने याचा फटका वसुलीला बसला आहे. परिणामी शास्तीची रक्कम पावणेआठशे कोटींच्या घरात गेली आहे. 1 एप्रिलपासून घरपट्टीच्या एक हजार 54 कोटींपैकी 154 कोटींची वसुली झाली आहे. पाणीपट्टीच्या 228 कोटींपैकी अवघी 37 कोटींचीच वसुली होऊ शकली. पाणीपट्टीची जुन्या थकबाकीचा आकडा 171 कोटीवर जाऊन पोहोचला आहे.
दरम्यान, करातून मिळणार्‍या रकमेचा उपयोग शहरातील विविध विकासकामांवर केला जातो. पण 2026-27 या आर्थिक वर्षातील कर वसुलीचा आलेख संथगतीने असल्याने याचा महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे. थकबाकी वसुलीकरिता करसंकलन विभागाकडून कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चालू आर्थिक वर्षात घरपट्टीचे 240 कोटी व पाणीपट्टीचे साठ कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासह शास्तीची रक्कम वसुलीकरिता प्रयत्न करावे लागणार आहेत. हजार कोटींची थकबाकी वसूल करायची कशी? अशी धास्ती कर्मचार्‍यांना पडली आहे.

मिळकतदारांनी त्यांच्याकडील चालू थकबाकी व जुनी शास्तीची थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावे. घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– नितीन पवार, उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा

विभागवार घरपट्टीची थकबाकी
विभाग                          थकबाकी
सातपूर                       110 कोटी 30 लाख
नाशिक पश्चिम          122 कोटी 47 लाख
नाशिक पूर्व                 185 कोटी 62 लाख
पंचवटी                       269 कोटी 52 लाख
नवीन नाशिक             160 कोटी 48 लाख
नाशिकरोड                  169 कोटी 53 लाख
एकूण                         1,017 कोटी 94 लाख
पाणीपट्टी थकबाकी :   191 कोटी

Mountain of tax arrears crosses the thousand-crore mark

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आभासी समृद्धीचा उथळ फुगा!

- सीमाताई मराठे ज्या वयात तरुणांच्या हातात बचत, गुंतवणूक आणि भविष्याची सुरक्षितता असायला हवी, त्या…

12 minutes ago

प्रचार- प्रसार प्रभाव

- राजेश शिरभाते एकावेळेस कोणी आपल्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करतो, तर एखादा तरुण त्याचे…

16 minutes ago

अन्नासाठी दाही दिशा… विकासाच्या दाव्यांमागचे कुपोषणाचे वास्तव

देशाची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, अन्नधान्याचे उत्पादन, महामार्गांची उभारणी आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा अभिमानाने उल्लेख…

33 minutes ago

चिनी कुरापती

तिबेटच्या सीमेला लागून असलेला अरुणाचल प्रदेश आमचाच आहे, असा दावा चीन करत आला आहे. चीनने…

41 minutes ago

शहरात धर्मध्वजारोहणाची तयारी पूर्ण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणार्‍या…

53 minutes ago

सुरळीत वाहतुकीसाठी समांतर मार्ग महत्त्वाचा

उपमुख्यमंत्री शिंदे : गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन नाशिक : प्रतिनिधीं नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती…

1 hour ago