नाशिक

बलेनो कारमधून आले अन् शेळ्या-मेंढ्या घेऊन पसार झाले

शहा येथे मध्यरात्री चोरी; 73 हजारांचा मुद्देमाल लंपास

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील शहा येथे मध्यरात्री पांढर्‍या रंगाच्या बलेनो कारमधून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी शेळी, मेंढ्या आणि कोकरे असा एकूण 73 हजार रुपये किमतीचा सात जनावरांचा कळप चोरून नेला. 24 ऑक्टोबर रोजी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
शहा येथील मेंढीपालन व्यावसायिक योगेश नानाभाऊ कांदळकर (वय 35) आणि त्यांचे चुलते भाऊसाहेब भवानी कांदळकर यांच्या मालकीची जनावरे चोरट्यांनी चोरून नेली. यामध्ये योगेश कांदळकर यांची 15 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची एक शेळी आणि प्रत्येकी 15 हजार रुपये किमतीच्या दोन पांढर्‍या मेंढ्यांचा समावेश आहे. तसेच भाऊसाहेब कांदळकर यांची प्रत्येकी सात हजार रुपये किमतीची चार पांढरी कोकरेही चोरट्यांनी लंपास केली.
एकूण सात जनावरांची किंमत 73 हजार रुपये असून, चोरट्यांनी ही जनावरे बलेनो कारमधून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. योगेश कांदळकर यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात कारचालकासह अन्य चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Balenos came from the car and spread out with goats and sheep

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अन्नासाठी दाही दिशा… विकासाच्या दाव्यांमागचे कुपोषणाचे वास्तव

देशाची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, अन्नधान्याचे उत्पादन, महामार्गांची उभारणी आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा अभिमानाने उल्लेख…

3 minutes ago

चिनी कुरापती

तिबेटच्या सीमेला लागून असलेला अरुणाचल प्रदेश आमचाच आहे, असा दावा चीन करत आला आहे. चीनने…

11 minutes ago

शहरात धर्मध्वजारोहणाची तयारी पूर्ण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणार्‍या…

24 minutes ago

कर थकबाकीचा डोंगर हजार कोटींच्या पार

1,245 कोटींपैकी अवघी 191 कोटींची वसुली पाच महिन्यांत वसुलीचे आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील घरपट्टी…

32 minutes ago

सुरळीत वाहतुकीसाठी समांतर मार्ग महत्त्वाचा

उपमुख्यमंत्री शिंदे : गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन नाशिक : प्रतिनिधीं नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती…

43 minutes ago

वाढता वाढता वाढे डेंग्यू रुग्णांची संख्या

तीन आठवड्यांत संख्या 109 वर नाशिक : प्रतिनिधी शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असून, ऑक्टोंबरच्या तीन…

49 minutes ago