नाशिक

शहरी बालपणातून शेतीत जिद्दीने घडवली यशाची वाट

नाशिक : प्रतिनिधी
बालपण शहरी भागात गेलेले, शेतीचा कोणताही पूर्वानुभव नसलेले आयुष्य आणि लग्नानंतर थेट शेतीची जबाबदारी… अशा परिस्थितीत केवळ जिद्द, मेहनत आणि शिकण्याच्या वृत्तीच्या जोरावर अलका उत्तम पिंगळे यांनी शेतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मातोरी येथील या महिला शेतकरी 1994 पासून शेतीव्यवसायात कार्यरत आहेत. टोमॅटो आणि झेंडूच्या लागवडीतून त्यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांच्या या कृषी प्रवासाची दखल घेत त्यांना विविध कृषी पुरस्कारांसह राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अलका पिंगळे यांचे बालपण शहरी वातावरणात गेले. त्यामुळे शेतीविषयी त्यांना फारशी माहिती नव्हती. मात्र, लग्नानंतर शेतकरी कुटुंबात आल्यानंतर त्यांनी शेती क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला अनुभव नसतानाही त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेत शेतीची कामे शिकून घेतली. त्यावेळी त्यांचे कुटुंब मोठे संयुक्त कुटुंब होते. कुटुंबातील 25 सदस्य एकत्र राहत होते आणि कुटुंबाकडे 15 एकर शेती होती. द्राक्ष हे उत्पन्नाचे प्रमुख पीक होते. कालांतराने द्राक्षबागा जुन्या झाल्यामुळे त्या काढून टाकण्यात आल्या. नंतर टोमॅटो हे मुख्य पीक म्हणून घेतले जाऊ लागले. त्यासोबत झेंडूच्या फुलांची लागवडही सुरू करण्यात आली.
आज शेतीतील मजुरीचे दर वाढत असल्याने अलका आणि त्यांचे पती स्वतः शेतात राबतात. त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत होते.
शेती करताना महिला म्हणून त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. घरातील जबाबदार्‍या सांभाळून शेतातील कामे पूर्ण करणे, हा रोजच्या जीवनाचा भाग बनला. महिला शेतकर्‍यांना शेतीत प्रगती करण्यासाठी अधिक संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत अलका पिंगळे व्यक्त करतात. त्यांच्यासाठी सुलभ कर्जव्यवस्था, शेतीसाठी विविध अनुदाने, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि थेट बाजारपेठेत शेतमाल विक्रीच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. महिला बचत गटांना प्रोत्साहन दिल्यास महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढण्यास मदत होईल, असेही त्या सांगतात.
आजच्या तरुण-तरुणींनी शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक उद्योग म्हणून पाहावे, असे आवाहन त्या करतात.

Forging a path to success in agriculture through sheer determination—from an urban childhood

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago