महापालिका प्रशासनाची सावध भूमिका
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता महापालिका प्रशासनातर्फे साधुग्राममधील सतराशे झाडे तोडून आखाड्यांसाठी टेंटची उभारणी केली जाणार आहे. पण या वृक्षतोडीला नाशिककरांसह पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केल्याने हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादा व उच्च न्यायालयात गेले आहे. हरित लवादाने 16 डिसेंबरपर्यर्ंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. दरम्यान, न्यायालय जो काही निर्णय देईल तो मान्य असेल. वृक्षतोडीला सध्या स्थगिती असून, ती पुढे तशीच ठेवल्यास त्यानुसारच म्हणजे वृक्षतोड न करता साधुग्रामची उभारणी केली जाईल, असे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता नऊ ते दहा महिन्यांचाच अवधी बाकी आहे. त्यातच अद्याप तपोवनातील साधुग्रामच्या वृक्षतोडीवर न्यायालय व हरित लवादाकडून अंतिम निर्णय आलेला नाही. न्यायालयाकडून अंतिम निर्णय येण्यास अजून किती दिवस जातील, हे सांगता येणे शक्य नसल्याने महापालिका प्रशासनाने त्याचे नियोजन सुरू केले आहे. वृक्षतोडीची स्थगिती कायम राहिल्यास झाडे न तोडताच साधुग्रामध्ये टेंट उभारून साधू-महंतांंना सुविधा पुरवल्या जाऊ शकतील. महापालिका प्रशासनाची साधुग्राममधील सतराशे झाडांवर कुर्हाड चालवण्याची तयारी होती. परंतु नाशिकसह राज्यभरातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमींना ही बाब समजताच या निर्णयाला कडाडून विरोध करत आंदोलन पुकारण्यात आले होते. देशभरात साधुग्रामचा विषय चर्चेत आला होता.
दरम्यान, साधुग्राममध्ये तोडल्या जाणार्या झाडांच्या बदल्यात
महापालिका विविध सामाजिक संस्था, वृक्षमित्र, शाळा, दिंडी आदींच्या माध्यमातून शहरात पन्नास हजारांपेक्षा जास्त झाडांची लागवड करत आहे. इतके करूनही वृक्षतोडीवर न्यायालय किंवा हरित लवादाने स्थगिती ठेवल्यास ऐनवेळी कुठलीही धावपळ होऊ नये यासाठी प्रशासनाने त्याद़ृष्टीनेही नियोजन केल्याचे समजते. उच्च न्यायालयात मनसेचे अॅड. नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरही अद्याप सुनावणी होणे बाकी आहे.
तपोवनातील वृक्षतोडीबाबत
सद्यःस्थितीत स्थगिती आहे. भविष्यात जर स्थगिती न उठविल्यास आपल्याला आहे त्या स्थितीनुसार काम करावे लागेल.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा
…So, could the ‘Sadhu-gram’ (settlement for ascetics) be established without cutting down any trees?
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…