माजी नगरसेवकाने मागितली 90 लाखांची खंडणी

विनायक खैरेंसह आणखी एकाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा

पंचवटी : प्रतिनिधी
मखमलाबाद परिसरातील मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोडवरील एका प्लॉटवर अवैध कब्जा मिळवत त्यावरील कब्जा सोडविण्यासाठी 90 लाखांंची खंडणी मागितली. याप्रकरणी विनायक ऊर्फ नय्या खैरे यांच्यासह एका जणावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ रोडवरील मखमलाबाद -म्हसरूळ लिंक रोडवरील सर्व्हे नं. 19/1/अ प्लॉट नं. 10 येथे विनायक खैरे ऊर्फ नय्या खैरे यांनी 2019 पासून ते आतापर्यंत अवैध कब्जा केला होता. विनायक खैरे व नीलेश मधुकर आहेर यांनी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. गाडी अडवून प्लॉटवरील कब्जा काढून प्लॉट रिकामा करून देण्याच्या मोबदल्यात 90 लाख खंडणीची मागणी केली. याबाबत अतुल प्रभाकर आहेर (वय 38, रा. अवध उटोपिया, फ्लॅट नं. 802, जे विंग, राधानगर, मखमलाबाद) यांनी विनायक खैरे व नीलेश आहेर यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर करत आहेत.

Former corporator demands ransom of Rs 90 lakhs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *