नाशिक

बस अपघातात सुदैवाने 21 विद्यार्थी सुखरूप

दिंडोरी : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील ओझर येथील खासगी दियान स्कूलच्या बसला सोमवारी (दि. 9) दुपारी एकच्या सुमारास सय्यद पिंपरीजवळ अपघात झाला. या अपघातात 21 विद्यार्थ्यांना सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले व परिसरातील शेतकर्‍यांनी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढल्याने अनर्थ टळला. विशेष म्हणजे या स्कूलबसचा चालक दारू पिऊन बस चालवत होता, असे अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील ओझर येथील दियान युनिव्हर्सल स्कूलची बस (एमएच 15, ईएफ 0289) दुपारी एकच्या सुमारास विद्यार्थी सोडण्यासाठी निघाली; परंतु बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला दोन पलट्या खाल्याने अपघात झाला. परंतु आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी ताबडतोब बसकडे धाव घेऊन तसेच सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. अपघातात दोन-तीन मुलांना मुका मार, तसेच कमरेला दुखापत झाल्याने पालकांनी दियान स्कूल बसचालक, स्कूल व्यवस्थापन व शिक्षकांवर संताप व्यक्त केला. दियान स्कूलच्या संबंधित चालकावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू व विद्यार्थी स्कूलमध्ये पाठवणार नाहीत.
यावेळी सय्यद पिंपरीचे माजी सरपंच ढिकले, जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीचे सदस्य कुणाल बागूल, पालक सचिन जोंधळे, नितीश कुमार, प्रवीण काळे, सचिन राजोळे, नामदेव ढिकले, गणेश जाधव आदी उपस्थित होते.

सय्यद पिंप्री रोडवरील अपघातात ज्या बसमध्ये दहा ते बारा विद्यार्थी बसण्याची परवानगी असतानाही 21 विद्यार्थी बसवूून आणले. बसचा चालक दारू प्यालेला असल्याने हा अपघात झाला. विशेष म्हणजे, अपघातानंतर माजी सरपंच ढिकले व शेतकर्‍यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढले नसते, तर मोठा अनर्थ झाला असता. अनेक चालकांकडे परवाने नसतानाही बस चालवतात. शासनाने अशा स्कूलवर कारवाई करावी.
– कुणाल बागूल, ग्रामपंचायत सदस्य, जऊळके दिंडोरी

Fortunately, 21 students were safe in the bus accident.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago