परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ, ग्लोइंग आणि फ्लॉलेस दिसण्यासाठी योग्य मेकअप टेक्निक जाणून घेणं आवश्यक आहे. चला, जाणून घेऊया यासाठी सर्वांत प्रभावी उपाय.
तुमचा मेकअप कितीही महागड्या प्रॉडक्ट्सने केला असला, तरी योग्य क्रमाने ते लावणे खूप महत्त्वाचे असते. विशेषतः मेकअप बेस तयार करताना एक प्रश्न अनेक महिलांच्या मनात येतो आधी फाउंडेशन लावायचं की कन्सीलर? हा छोटासा निर्णय तुमचा लूक एकदम ग्लॅमरस करू शकतो किंवा सगळा मेकअप खराब करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मेकअप एक्सपर्ट्स काय सांगतात आणि फ्लॉलेस लूकसाठी काय आहे बेस्ट टेक्निक आहेत.
काय कराल?
मेकअप आर्टिस्ट्स आणि ब्यूटी साइट्सप्रमाणे, सर्वांत आधी फाउंडेशन लावणं योग्य असतं. फाउंडेशन स्कीनचा टोन इवन करतो आणि एक स्मूद बेस तयार करतो. फाउंडेशन लावल्यावर तुमचे डाग-धब्बे, डार्क सर्कल्स यांपैकी बरेचसे आधीच हलके दिसायला लागतात. त्यानंतर जिथे अजून कव्हरेज हवी, तिथे कन्सीलरने टचअप करायला सोपं जातं. यामुळे मेकअप नॅचरल आणि लाइट वाटतो.
आधी कन्सीलर लावणं चुकीचं का?
जर तुम्ही आधी कन्सीलर लावलात आणि नंतर फाउंडेशन दिलं, तर कन्सीलर हलका होतो किंवा पसरतो. त्यामुळे डार्क सर्कल्स, स्पॉट्स आणि पिग्मेंटेशन नीट कव्हर होत नाहीत. कन्सीलरला टार्गेटेड पद्धतीने लावणं महत्त्वाचं असतं. म्हणून तो शेवटी लावणं जास्त चांगलं.
तुमच्या स्कीन टाइपनुसार वापरा ही ट्रिक
ड्राय स्कीनसाठी : आधी हायड्रेटिंग प्रायमर, मग फाउंडेशन आणि शेवटी कन्सीलर वापरा.
ऑइली स्कीनसाठी : मॅट फाउंडेशन आणि मॅट कन्सीलरचा वापर करा.
मिक्स्ड स्कीनसाठी : आधी बेस टोन एकसारखा करण्यासाठी फाउंडेशन लावा.
योग्य कन्सीलर कसा निवडाल?
डार्क सर्कल्ससाठी- पिंक किंवा पीच अंडरटोन असलेला कन्सीलर.
स्पॉट्ससाठी- यलो अंडरटोन कन्सीलर.
रेडनेससाठी- ग्रीन बेस कन्सीलर.
लिक्विड प्रॉडक्ट्स कसे लावायचे?
लिक्विड फाउंडेशन आणि कन्सीलरसाठी डॅम्प ब्यूटी ब्लेंडर वापरावा. याने प्रॉडक्ट स्कीनमध्ये नीट ब्लेंड होतं आणि चेहरा केकी लागत नाही. आधी फाउंडेशन लावा, मग हलक्याच हाताने कन्सीलर डॉट करा आणि ब्लेंड करा.
सेटिंग पावडर आणि स्प्रे
फाउंडेशन आणि कन्सीलर नीट सेट झाल्यावर ट्रान्सलूसेंट पावडरने बेस लॉक करा. त्यानंतर सेटिंग स्प्रेचा वापर करा, जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकतो.
ब्यूटी एक्सपर्ट्स आणि अनेक संशोधकांचं मत असं आहे की, मेकअप करताना आधी फाउंडेशन आणि मग कन्सीलर लावणं, हाच सर्वोत्तम क्रम आहे. ही आयडिया मेकअप हलका ठेवते, फ्लॉलेस फिनिश देते आणि नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवते. त्यामुळे पुढच्या वेळी मेकअप करताना हे सिक्रेट नक्की लक्षात ठेवा, आधी फाउंडेशन,
मग कन्सीलर.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…