भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील जाडगाव फाट्यावर शुक्रवारी (दि. 5) दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव व अनियंत्रित स्कॉर्पिओ जीपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.
मूळचे मलकापूर येथील रहिवासी असलेले आणि वरणगाव परिसरातील रहिवासी असलेले हे आदिवासी पारधी कुटुंबातील सदस्य दुचाकीने वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. स्थानिकांंनी जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिघांना मृत घोषित केले, तर चौथ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार विजय शंकर काळे (वय 19), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30), विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14) आणि अवघ्या एक वर्षाची निष्पाप चिमुरडी मोनालिसा शिवबसप्पा भोसले या चौघांना जीव गमवावा लागला आहे.

Four of a family killed in collision with speeding Scorpio

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *