नाशिक

इंडियाबुल्सच्या निर्जन आवारात चौथा बिबट्या जेरबंद

झाडी, पाण्याच्या उपलब्धतेमुळे ‘रतन इंडिया’चा भाग बनला बिबट्यांचा सुरक्षित अधिवास

सिन्नर : प्रतिनिधी
मुसळगाव-गुळवंच शिवारातील इंडियाबुल्स (रतन इंडिया) कंपनी परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींमुळे
चर्चेत आला आहे. गुरुवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात साडेतीन वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. विशेष म्हणजे, गेल्या एप्रिल महिन्यापासून या परिसरात पकडण्यात आलेला हा चौथा बिबट्या असल्याने कंपनी परिसरातील कामगार आणि कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास कंपनीच्या आवारात लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल टी. ए. भुजबळ, वनरक्षक एन. बी. निकम, रेस्क्यू टीमचे रोहित लोणारे, निखिल वैद्य, मोहन मोहिते तसेच कंपनीच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेत मोहदरी वनोद्यानात हलविण्यात आले.
या घटनेनंतर परिसरातील कामगारांनी काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास घेतला असला, तरी अजूनही परिसरात इतर बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने चिंता कायम आहे.
दरम्यान, औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रकल्प परिसरात सध्या अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे कामे करताना बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याने कामगारांना भीतीच्या छायेत काम करावे लागत आहे. काही कर्मचार्‍यांनी रात्रीच्या शिफ्टदरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याचाही दावा केला आहे. त्यामुळे वनविभागाकडून या परिसरावर अधिक लक्ष ठेवले जात असून, पुढील काही दिवस पिंजरे आणि निगराणी वाढविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

‘निर्जन प्रकल्प’ बनला बिबट्यांचा आश्रय

इंडियाबुल्स कंपनीचा विस्तीर्ण परिसर सध्या अनेक ठिकाणी ओसाड आणि निर्जन आहे. शेकडो एकर जागेत वाढलेली झाडी, बाभळीची दाट वाढ आणि पाण्याची उपलब्धता यामुळे हा परिसर बिबट्यांसाठी नैसर्गिक अधिवासासारखा बनल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच परिसरातून एक नर, एक मादी आणि एका बछड्यासह तीन बिबटे पकडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा चौथा बिबट्या सापडल्याने वनविभागही सतर्क झाला आहे.

Fourth leopard captured in deserted Indiabulls premises

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago