नाशिक

सिन्नर बाजार समितीत ‘शेतकरी खानावळ’चा शुभारंभ

शेतकर्‍यांना आता अल्पदरात जेवण; चहा-नाश्त्याचीही सुविधा उपलब्ध

सिन्नर : प्रतिनिधी
बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना स्वच्छ व माफक दरात भोजन मिळावे, यासाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ‘शेतकरी खानावळ’ सुरू करण्यात आली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दिवसभर बाजारात थांबणार्‍या शेतकर्‍यांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या खानावळीचे संचालन श्रीराम समर्थ महिला बचतगटामार्फत केले जाणार आहे. येथे शेतकरी, व्यापारी व बाजार समितीतील विविध घटकांना चहा, नाश्ता आणि भोजनाची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे, संचालक शरद थोरात, गणेश घोलप, जालिंदर थोरात, सुनील चकोर, रवींद्र शेळके, शरद चतुर, नवनाथ नेहे, पिराजी पवार, ज्ञानेश्वर गाडे, शुभम वारुंगसे, कैलास वाजे, केशव कोकाटे आदी उपस्थित होते. तसेच व्यापारी बाळकृष्ण चकोर, बाबूशेठ लड्डा, दिलीप खिंवसरा यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापार्‍यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. बाजार समितीत येणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला कमी खर्चात भोजनाची सुविधा मिळावी, हा उपक्रम सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे आवाहन सभापती श्रीकृष्ण घुमरे यांनी यावेळी केले.

‘Farmers’ restaurant’ inaugurated at Sinnar Market Committee

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago