ऐकावे ते नवलच,,, इडली विक्रेत्याकडे सापडली इतकी बनावट रोकड

नाशिक: तामिळनाडू राज्यातुन नाशिकमध्ये रोजगारासाठी आलेल्या एका इडली विक्रेत्याकडे तब्बल पाच लाखांच्या बनावट नोटा सापडल्याची घटना उघडकीस आली आहे, भारत नगर येथे इडली विक्री करणाऱ्या मलायारसन मदतसमय यांच्याकडून
500 आणि दोन हजार रुपयांच्या 244 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मलायारसन हा मूळ तामिळनाडू राज्यातील आहे.
भारतीय चलनी नोटा नकली तयार करणे आणि त्या नोटा खरे चलन म्हणून वापरणे याप्रकरणी गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीकडून एकूण 5
लाख 8 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा, 3 हजार
तीनशे रुपये रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात
आला आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री भारतनगर परिसरातून पोलिसांनी या संशयितला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळे अधिक तपास करत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

7 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

15 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

15 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

15 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

15 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

16 hours ago