त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसले
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून
भाजी मंडईत पाणी घुसले आहे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी साचले. भाविकाना पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली,